जळगाव ः प्रतिनिधी
इकरा एज्युकेशन सोसायटीतर्फे एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सच्या दोन विद्यार्थिनींनी परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून सुवर्णपदक पटकावले.त्यात हुमैरा अय्युब खान ( बॉटनी) तर सना कौसर नियाजोद्दीन शेख ( बीए उर्दू) यांचा समावेश आहे.
या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य इब्राहिम पिंजारी, डॉ. चाँद खान, डॉ. फिरदौस, डॉ. तनवीर खान, डॉ. राजेश भामरे, मौलाना मुझम्मील नदवी यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा अध्यक्ष डॉ. करीमभाई सालार, डॉ. इकबाल शाह, एजाज मलिक, अमीन बादलीवाला, डॉ. ताहीर शेख, मजीद सेठ झकेरिया, शेख अब्दुल रशीद, अब्दुल रउफ शेख, प्रा. जफर शेख, नबी बागवान, डॉ. जबिउल्ला,अझीझ सालार, मुहम्मद तारिक शेख यांनी गौरव केला.