विषेश प्रतिनिधी | जळगाव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शनिवार,22 जून रोजी जळगाव येथे शिक्षक पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या प्रचारार्थ येथील आदित्य लॉनवर सभा झाली.
सभेला गर्दी म्हणून आलेले शिक्षक भाड्याचे होते.या सभेनंतर जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांना पैसे वाटप करण्यात आल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याने थोडीबहुत नीतिमत्ता शिल्लक असलेल्या शिक्षकांनी गरीब होऊन सभेत भाडोत्री यावे, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षक आणि कर्मचारी तसेच संस्थाचालक यांची आज आदित्य लोन येथे सभा आयोजित करण्यात आली होती. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव येथे किशोर दराडे महायुतीचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आले होते.यांच्या सभेनंतर जे शिक्षक आले होते, त्यांना काही पैसे वाटप करण्यात आले. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ही येत्या २६ जून रोजी पार पडत आहे. यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव दौऱ्यावर आले होते. ही सभा सायंकाळी सहा वाजता आदित्य लॉन येथे आयोजित करण्यात आली होती.मात्र मुख्यमंत्री हे दोन तास उशिरा आले असल्याने या ठिकाणी शिक्षकांचा हिरमोड झाला. नऊ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभेला संबोधित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर जळगाव जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थेतील संस्थाचालक तसेच मुख्याध्यापक कर्मचारी या सभेला बोलवण्यात आले होते. या सभेला उशीर झाल्याने काही कर्मचारी या ठिकाणाहून बाहेर पडले. मात्र सभा आटोपल्यानंतर आदित्य लॉनमध्येच जे कर्मचारी शिक्षक आले होते,त्यांना पैसे वाटप करण्यात आले आहे. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला.सुषमा अंधारे यांनी सुद्धा ही घटना ट्विट करत निवडणूक आयोग कुठे आहे, असा सवाल व्यक्त केला आहे.यानंतर या घटनेची चर्चा होत आहे. याबाबत आता नवा वाद उफाळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.