जळगाव : प्रतिनिधी
आयुष्मान भारत ह्या केंद्रीय आरोग्य उपक्रम अंतर्गत आरोग्यवर्धिनी दिवस*” म्हणून साजरा करण्यात येत असून *16 एप्रिल रोजी 4 वर्ष पूर्ण झाले. आरोग्यवर्धिनी दिवसाचे औचित्य साधून ग्राम पातळीवर देशभरात विविध आरोग्यदायी उपक्रम रबिवण्यात आले.
जळगाव तालुक्यातील आरोग्यवर्धिनी केंद्र जळगाव खुर्द येथे लाभार्थी साठी प्रामुख्याने ई – संजीवनी पोर्टल वरून टेली कन्सल्टिग, योग वर्ग तसेच झुम्बा डान्स व्यायाम प्रशिक्षण, उचित आहार विहार, गरोदर माता तपासणी, SAM MAM बालक तपासणी, तीस वर्षवरील लोकांसाठी NCD स्क्रिनइंग्, वयोगट 12 ते 14 वर्ष मधील मुलमुलींना Covid लसीकरण, वृक्षरोपण, आदी हेल्थ अँड वेलनेस* उपक्रम राबवण्यात आले.
हा कार्यक्रम जिल्हापरिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टि.जमादार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र नशिराबाद येथील डॉ. इरेश पाटील, डॉ चेतन अग्निहोत्री, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ तुषार राणे, आरोग्य सेवक , आरोग्य सेविका, जळगाव खुर्द गृपग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य, सर्व आशावर्कर , अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामस्थ आदींनी परिश्रम घेतले.