जळगाव ःप्रतिनिधी
येथील आयएमए आणि रिजनल व स्टेट ऑर्गन ॲण्ड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेन, केईएम हॉस्पिटल, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अवयवदान’ जनजागृती या विषयावर डॉक्टरांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
जळगाव आयएमएच्या सभागृहात झालेल्या या कार्यशाळेप्रसंगी अध्यक्ष डॉ. दीपक आठवले, सचिव डॉ.जितेंद्र कोल्हे, डॉ.अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेत अवयवदान गरज व प्रक्रिया या विषयी डॉ.अमित भंगाळे यांनी तर ब्रेनडेड संकल्पना याबद्दल डॉ.तेजेंद्र चौधरी यांनी माहिती दिली. मानवी अवयवाचे प्रत्यारोपण, त्याविषयीचा कायदा 1994 व सुधारणा या विषयी डॉ.राहुल चिरमाडे यांनी तर डॉ.सचिन सरोदे अवयवदानाविषयीचे व्हिडिओ सादर केले.
रोटो, सोटोच्या संचालक व केईएम हॉस्पिटलच्या विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुजाता पटवर्धन यांच्या मार्गदर्शनात ही कार्यशाळा झाली. मुंबईचे आनंद शिरसाठ यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.रुपाली बेंडाळे यांनी केले. कार्यशाळेस 70 डॉक्टरांची उपस्थिती होती.