लोणार (गुलाब शेख)
शिवसेना खासदार प्रतापराव जाधव व शिवसेना आमदार संजय रायमुलकर. शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.बळीराम मापारी मार्गदर्शनाखाली आयएनएस विक्रांत प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात किरीट सोमय्या व निल सोमय्या यांच्यावर देशद्रोही चा गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी यासाठी . शिवसेनेच्या वतीने लोणार येथील चौकात आंदोलन करण्यात आले . यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांच्या प्रतिकात्मक फोटोच दहन करून त्यांच्याविरुध्द प्रचंड घोषणाबाजी केली . तसेच तहसीलदार प्रभारी पदी असलेल्या गायकवाड मॅडम यांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा प्रमुख प्रा.बळीराम मापारी शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे गणेश सोसायटी अध्यक्ष गजेंद्र मापारी युवासेना तालुका अध्यक्ष गजानन मापारी नगर सेवक डॉ.अनिल मापारी,कु.उ.बा.समितीचे माजी सभापती सुनिल पाटील सुलताने शिवसेना उपतालुका प्रमुख भगवान पाटील सुलताने,संतोष आघाव,नगरसेवक छगन कंकाळ,धरमचंद लुनिया, प्रमोद मापारी,बाबुसिंग जाधव विभाग प्रमुख विठ्ठल घायाळ,रफिक भाई अशोक वारे राहुल मापारी, पुरुषोत्तम केंद्रे,सुनील मापारी सह शिव सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसैनिक हजर होते
