मुंबई : वृत्तसंस्था
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत भाजपनं यश मिळवल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारपुढं राजकीय संकट निर्माण आहे. शिवसेनेचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ शिंदे हे सध्या नॉट रिचेबल असून बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 21, 2022
एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे २२ आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं असून “आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत… बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे.. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.



