आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठबळाने सर्वसमावेशक असे “जनपरिवर्तन पॅनल’ देणार प्रस्थापितांना धक्का…

0
22

चाळीसगाव प्रतिनिधी 

चाळीसगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने “जन परिवर्तन पॅनलच्या” प्रचाराचा शुभारंभ आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रामदेवता “आनंदामाता मंदिर” याठिकाणी नारळ फोडून करण्यात आला. यावेळी देवीची आरती करून साकडे घालण्यात आले. जनपरिवर्तन पॅनल “छत्री” निशाणी मिळाली असून सध्या पावसाळा सुरु झाल्याने सर्वसामन्यांना छत्रीची आवश्यकता भासत असते. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण व जनपरिवर्तन पॅनलची छत्री कुणाच्या एकाधिकारशाहीला कात्री लावते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

जवळपास एक शतकानंतर चाळीसगाव विकास सोसायटीची निवडणूक होत असून आतापर्यंत राजकीय दबाव टाकून, विविध माध्यमातून निवडणुका बिनविरोध करण्यात आल्या. एकप्रकारे मतदारांचा हक्क त्यांच्यापासून डावलला जात होता. संस्थेच्या शेकडो सभासदांना आपण चाळीसगाव विकास सोसायटीचे सभासद आहोत हेदेखील माहिती नव्हते अशी परिस्थिती होती. मात्र यावर्षी होणाऱ्या या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वसामान्य सभासदांना न्याय मिळवून देण्यासाठी, गेली अनेक दशके एकाच घरात असलेल्या सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी एक सर्वसामावेश आणि सर्व जाती-धर्माला प्रतिनिधित्व देणारे जनपरिवर्तन पॅनल उभे राहिले आहे. चाळीसगाव शहरासह, टाकळी प्रचा, कोदगाव, ओझर गावातील सुज्ञ सभासद जनपरिवर्तन पॅनलला प्रचंड बहुमताने निवडून देऊन इतिहास घडवतील असा विश्वास असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. तसेच ही निवडणूक घराणेशाही विरुद्ध सर्वसामान्य सभासद मतदार अशी राहणार असून ज्यांनी केवळ घराची मालमत्ता म्हणून चाळीसगाव विकास सोसायटीचा वापर केला, मोठी पदे भोगली मात्र सभासदांना न्याय दिला नाही त्यांना नाकारण्याची संधी अनेक दशकानंतर सभासदांना चालून आली असल्याने मतदार कोणत्याही आमिषाला व दबावाला बळी न पडता उत्स्फुर्तपणे मतदान करतील व जनपरिवर्तन घडवतील असे देखील आमदार चव्हाण यांनी सांगितले.

यावेळी जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रविंद्र पाटील, सरदारसिंग राजपूत, जनपरिवर्तन पॅनलचे पॅनलप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य शेषराव पाटील, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, जेष्ठ नगरसेवक राजेंद्रअण्णा चौधरी, माजी पंचायत समिती सदस्य जगनअप्पा महाजन, दिनेशभाऊ बोरसे, पियुष साळुंखे, नगरसेवक नितीन पाटील, बापू अहिरे, माजी नगरसेवक निलेश राजपूत, चिराग शेख, सोमसिंग राजपूत, सदानंद चौधरी, अॅड.कैलास आगोणे, योगेश खंडेलवाल, स्वप्नील मोरे, धर्मा बछे, अमोल चौधरी, अमोल चव्हाण, रणजीत पाटील, रणजीत देशमुख, दिनेश चौधरी, देवा गांगुर्डे, बंडू पगार, दिपकराजे देशमुख, सचिन स्वार, विजय गुजर, भावेश कोठावदे, अभय वाघ, मनोज चौधरी, जनपरिवर्तन पॅनल सर्व उमेदवार व भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आदी उपस्थित होते.

 

चाळीसगाव विकास सोसायटी निवडणुकीसाठी जनपरिवर्तन पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे

कर्जदार खातेदार मतदारसंघ
१) चौधरी संजय भगवान (चाळीसगाव)
२) गवळी राजेंद्र सिदाप्पा (चाळीसगाव)
३) गुजर पंडित भागा (टाकळी प्रचा)
४) गुजर संतोष गोविंदा (ओझर)
५) खान अकबर खान समशेद खान (चाळीसगाव)
६) पाटील आधार काशिनाथ (ओझर)
७) पाटील रामदास शंकर (ओझर)
८) राजपूत भरतसिंग शालीवान (चाळीसगाव)

इतर मागासवर्ग मतदारसंघ
९) पाटील शेषराव रामराव (कोदगाव)

महिला राखीव मतदारसंघ
१०) घेवरे यशोदा शंकर (टाकळी प्रचा)
११) गुजर गंगुबाई नामदेव (टाकळी प्रचा)

अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ
१२) गांगुर्डे हिरामण धुडकू (चाळीसगाव)

वि.जा.भ.ज.वि.मा.प्र. मतदारसंघ
१३) जाधव भाऊसाहेब बाबू (चाळीसगाव)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here