चाळीसगांव प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष,व जेष्ठ पत्रकार किसनरावजी जोर्वेकर यांना फोनवर आमदार मंगेश चव्हाण यांनी “आयुष्यातून उठवून टाकेल” अशी एकप्रकारे जीवे मारण्याची धमकी दि.८जून रोजी दिली, त्याबाबतची ऑनलाइन तक्रार जोर्वेकर यांनी पोलिस स्टेशन येथे दिली असून सोशल मिडियाद्वारे ती आम्हा सर्वांना ज्ञात झाली आहे, मागील काळात मुख्यमंत्री महोदयांना अपशब्द वापरनारे आमदार एका जेष्ठ पत्रकारांना आशा प्रकारची धमकी देत असतील तर,समाजात सदर घटनेचा मोठ्याप्रमाणावर निषेध व्यक्त होत आहे , या तक्रारीची दखल घेऊन तातडीने कायदेशीर कार्यवाही करावी.असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने देण्यात आले. यावेळी जि.प गटनेते शाशीभाऊ साळुंखे,अतुलदादा देशमुख, दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील तालुकाध्यक्ष दिनेश पाटील,शहर अध्यक्ष शाम देशमुख,पंचायत समितीचे सभापती अजय पाटील,नगरसेवक भगवान पाटील, दीपक पाटील,राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष मोहित भोसले,आर.के.माळी,ईश्वरसिंग ठाकरे,भूषण पाटील,अल्लाउद्दीन शेख, सुरेश पगारे,काचेश्वर सोनवणे,विजयसिंग जाधव,संजन जाधव,रतन साळुंखे,अभय सोनवणे,राजीव जाट,देवेंद्र देवरे,राजेंद्र मोरे,भूषण बोरसे,शहर उपाध्यक्ष सुजित पाटील,कपिल चव्हाण,अरुण पाटील,यदणेश बाविस्कर, आकाश पोळ,राकेश राखुडे, कुणाल पाटील, गौरव पाटील,अस्लम पिंजारी,पृथ्वीराज चौधरी,अमोल पवार,अलिंम शेख, गुंजन मोटे,कौस्तुभ ठाणगे,सुरज शर्मा आदी उपस्थित होते.