आमदार किशोर आप्पा पाटील यांचे आमदार निधीतून  पाचोरा भडगाव तालुक्यातील २९ सार्वजनिक वाचनालयांना १३ लाख रुपयांची पुस्तके भेट

0
20
 पाचोरा(वार्ताहर) 
 पाचोरा भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी वाचन संस्कृती वाढीसाठी पुढे सरसावत तसेच  विविध स्पर्धा  परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मतदारसंघातील २९  सार्वजनिक वाचनालयांना संक्रांत भेट म्हणून १३ लाख रुपयांची पुस्तके आपल्या स्थानिक विकास निधीतून भेट देत त्यांची संक्रांत गोड केली आहे.पाचोरा भडगाव तालुक्यातील वाचनालयांना पुस्तके वितरणाचा कार्यक्रम  ‘शिवालाय’ या संपर्क कार्यालयात शनिवारी दुपारी ११ वाजता संपन्न झाला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील हे होते व प्रमुख पाहुणे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले हे उपस्थित होते.  याप्रसंगी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सर्व वाचनालयाच्या संचालकांना युवा वर्गाला अधिकाधिक वाचनालयाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करावे व युवकांनी स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे सखोल अभ्यास करावा .प्रा. राजेंद्र चिंचोले लिखित दीपस्तंभ प्रकाशनाच्या ‘स्पर्धा परीक्षा सारथी ‘या पुस्तकाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विशेष कौतुक केले व हे स्पर्धा परीक्षा सारथी पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात श्रीकृष्ण रुपी सारथी बनून विद्यार्थ्यांचे जीवन सफल करेल असा आत्मविश्वास व्यक्त केला .प्रा. राजेंद्र चिंचोले हे आपल्या परिसरासाठी भूषण असून त्यांच्या ज्ञानाचा  युवावर्गासाठी उपयोग करून घ्यावा अशा प्रकारचे आवाहन किशोर आप्पा यांनी केले .पाचोरा व भडगाव तालुक्यातील सर्व लहान-मोठ्या वाचनालयांना भरीव निधी उपलब्ध करुन देऊ अशा प्रकारचे आश्वासन सर्व उपस्थित याप्रसंगी आमदार किशोर पाटील यांनी दिले
   याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्राध्यापक राजेंद्र चिंचोले यांनी आ. किशोर आप्पा पाटील विद्यार्थ्यांच्या व युवा वर्गाच्या विकासासाठी करीत असलेल्या वेगवेगळ्या शैक्षणिक प्रयत्नांचे व  वाचनालयासाठी केलेल्या भरीव योगदानाचे विशेष आभार मानले .   प्रा राजेंद्र चिंचोले यांनी युवावर्गाने त्यांच्या क्षमतांचा योग्य वापर करून आपल्या परिसराचा विकास करावा असे आवाहन केले .,तसेच स्पर्धा परीक्षेसाठी या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा पक्षांची माहिती होणार असल्याचे सांगितले.
   कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजु भाऊ उर्फ सुधीर पाटील यांनी केले याप्रसंगी मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर ‘ज्ञान वाटू या ,देश घडवू या’ अशा प्रकारचा संकल्प करुन मतदार संघातील युवा वर्गाला शुभेच्छा देण्यात आल्या .याप्रसंगी सार्वजनिक वाचनालय संचालक मंडळाला’ स्पर्धा परीक्षा सारथी’हे पुस्तक भेट देण्यात आले . कार्यक्रमास  स्वीय सहायक श्री राजेश पाटील, प्रवीण ब्राम्हणे, पाचोरा व भडगाव तालुक्यातील सार्वजनिक वाचनालयांचे संचालक मंडळ व शिवसैनिक उपस्थित होते .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गजू पाटील यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here