वाशिम : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने केलेल्या अटकेचा निषेधार्थ राज्यभरात तीव्र आंदोलन, निदर्शनं करण्यात येत आहेत.
दरम्यान आज नवाब मलिक यांच्या अटकेच्या विरोधात धरणे आंदोलन करण्याकरिता रिसोड मतदार संघाचे काँग्रेस आमदार अमित झनक हे वाशिम येथील आंदोलन आटोपून परत जात असताना, अकोला – नांदेड महामार्गावर सावरगाव गावानजीक जवळ आमदार अमित झनक यांच्या गाडीला ट्रकने मागून धडक दिल्याने अपघात झाला आहे.
या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसून, आमदार ही सुखरूप आहेत. मात्र यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.