यावल : तालुका प्रतिनिधी
नगरपालिका हद्दीत पटेल कॉलनीत यावल नगरपालिकेतर्फे गटारीचे बांधकाम सुरू आहे,गटारीचे बांधकाम न करता आधी डांबरीकरण रस्त्याचे काम बंद करून सिमेंट कॉंक्रिटचा रस्ता तयार करावा मग नंतर गटारीचे बांधकाम करावे अशी मागणी पटेल कॉलनीतील नागरिकांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
दि.११मे २०२१ रोजी मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गट नंबर ३९ व ४० या गटातील पटेल कॉलनीत सांडपाण्याचे गटारीचे बांधकाम झालेले नाही परंतु सदर परिसरात डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम होत आहे परंतु सदर भागात डांबरीकरण रस्त्याचे बांधकाम न करता आम्हास सिमेंट
कॉंक्रीट रस्ता तयार करून द्यावा जोपर्यंत सांडपाण्याचे गटारीचे बांधकाम करून मिळत नाही तोपर्यंत रस्त्याचे काम बंद ठेवण्यात यावे रस्त्याचे काम बंद न केल्यास आम्ही उपोषणास बसणार असा इशारा सुद्धा पटेल नागरिकांनी दिला आहे.
निवेदनावर पप्पू पटेल,डॉ.जहीर पटेल,बशीर पटेल,जावेद खान,रज्जाक पटेल, बाबूलाल पटेल,सिकंदर हसन तडवी, वहीम पटेल,मनिष पटेल,तनवीर पटेल,सुपडू तडवी,साबिर पटेल,भुरा पटेल इत्यादी अनेक नागरिकांनी दिलेल्या निवेदनावर स्वाक्षरी करून मागणी केलेली आहे. याबाबत यावल नगरपालिका काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.