विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
दिनांक 26/5/2022 वार गुरुवार रोजी आदिवासी समन्वय समितीचे कोळी मल्हार , कोळी महादेव,टोकरे कोळी इ.अनुसूचित जमातीच्या विद्यार्थां शिक्षणापासून वंचित राहू नये,तसेच जी.प. व पंचायत समिती निवडणुका लवकरच जाहीर होणार आहे .
तसेच शेतमजूर शेतकरी,सुशिक्षीत बेरोजगार,भूमिहीन लाभार्थी यांना विकासाच्या योजनेसाठी बऱ्याच बांधवाना प्रस्ताव भरायचे आहे. आणी काही प्रलबीत प्रश्नांसाठी वेळ मिळावा करिता उपविभागीय अधिकारी उपविभाग सिल्लोड यांना निवेदन देण्यात आले. यावेळे आदिवासी समन्वय समितीचे मराठवाडा विभाग अध्यक्ष सखाराम बिऱ्हाडे, उपाध्यक्ष आनंदा इंगळे, युवा जि. अध्यक्ष,विजेंद्र इंगळे,जिल्हा समन्वय पांडुरंग साळवे, गणपत साळवे, ता.स. दीपक सोनवणे, युवा ता.अ. गोपाल इंगळे, विष्णू भोटकर कैलास गवळी ता अ.जनार्दन जोहरे, ता.स. शालिक गवळी, महादू तायडे ,इतर पदाधिकारी उपस्थित होते.