सोयगाव तालुका प्रतिनिधी
तालुका कृषी विभागाकडून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून आत्महत्या ग्रस्त आणि कोरोनामुळे विधवा झालेल्या महिला शेतकऱ्यांना तूर कीटचे मोफत वितरण करण्यात आले आहे.त्यामुळे खरिपाच्या हंगामात या महिला शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सोयगाव तालुक्यातील आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांचे वारस आणि कोरोनामुळे निधन झालेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना खरिपाच्या हंगामासाठी मदत म्हणून तूर कीटचे मोफत वितरण करण्यात आले यामध्ये तब्बल १२५ शेतकऱ्यांपर्यंत हि मदत पोहचली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संगीता पवार यांनी दिली असून उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.तालुका कृषी विभागाकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यात प्राप्त लक्षांकानुसार मदतीचे वाटप पूर्ण झाले असून दुसया टप्प्यातही पुन्हा या मदतीचे वितरण करण्यात येणार आहे.गावनिहाय तालुका कृषी सहायकांनी हि मदत वारसांना दिलेली आहे.
पावूस गायब झाल्याने पुन्हा चिंता वाढली आहे
निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि नापिकीमुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे खरीप हंगाम २०२१ मध्ये सोयगाव तालुक्यात अकरा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असतांना यंदाही पावसाने दडी मारल्याने आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.बियाणे मिलालेपारान्तु पावूस गायब झाल्याने पुन्हा चिंता वाढली आहे.