Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»आता शिवसेनेच्या खासदारांचीही मागणी, भाजपसोबत सरकार बनवा; मुख्यमंत्र्यांना निरोप…
    राजकीय

    आता शिवसेनेच्या खासदारांचीही मागणी, भाजपसोबत सरकार बनवा; मुख्यमंत्र्यांना निरोप…

    SaimatBy SaimatJune 22, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी 

    शिवसेनेच्या  आमदारांनंतर आता शिवसेनेतील खासदारही भाजपासोबत (BJP) सरकार बनवण्यासाठी आग्रही असल्याची माहिती पुढे आली आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसला सोडा आणि भाजपसोबत चला असा सूर शिवसेना खासदारांनी शिवसेनेच्या बैठीकीत आवळला असून, त्याबाबतचा निरोप पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    विरोधकांना नाकीनऊ आणण्यासाठी केंद्रातील भाजपा सरकारकडून सातत्याने ईडी यासारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका सातत्याने होत आहे. एकीकडे भाजपाच्या एकाही नेत्याची ईडी चौकशी होत नसल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यातील राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या विविध नेत्यांना केंद्रीय तपास यंत्रणा ईडीच्या नोटीस येत आहेत. त्यांना सतावण्याचे काम केंद्रातील भाजपा सरकारकडून होत आहे. याला कंटाळूनच आता शिवसेनेच्या काही आमदारांनी बंड बंड पुकारले असताना आता शिवसेनेच्या खासदारांचीही हीच भावना आहे.

     

    राज्यात आधी शिवसेना आणि भाजपाती युती होती. मात्र २०१९ मध्ये ती तुटली. मतभेद वाढले. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. मात्र भाजपाकडून याचा वचपा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून काढला जात आहे. सरकार अस्थिर करण्याबरोबरच सत्ताधाऱ्यांना ईडीच्या नोटीसदेऊन त्यांना त्रास देण्याचे काम सतत सुरू आहे. अनिल परब, नितीन सरदेसाई, भावना गवळी यांच्यासह उद्धव ठाकरे, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नातेवाईकांना ईडीच्या नोटीस येवून गेल्या आहेत. या सर्व राजकारणाला कंटाळून शिवसेनेमधून आधीपासूनच मागणी होत होती.

    राज्यात शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत स्थापन केलेले सरकार भाजपाला आवडलेले नाही. त्यामुळे शिवसेना नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी अनेकदा केला आहे. एकनाथ शिंदेंना फोडण्याचे षडयंत्र करतानाच त्याच दिवशी अनिल परब यांना नोटीस येते, या धावपळीत ते आमच्याबरोबर असून नयेत, हे षडयंत्र आहे. हे सर्व ठरवून केले जात असल्याचे ते म्हणाले होते. तर शिवसेनेचे जवळपास सहा खासदारही ईडीच्या रडारवर असून त्यांच्याकडूनही आता भाजपाबरोबर जाण्याची मागणी होत होती.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.