आता वधू-वरांच्या अनुपस्थितीतही करता येणार विवाह नोंदणी

0
25
आता वधू-वरांच्या अनुपस्थितीतही करता येणार विवाह नोंदणी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । विवाहाची नोंदणी करण्यासाठी यापूर्वी वधू-वर दोघांनाही विवाह नोंदणी कार्यालयात उपस्थित राहावे लागत होते मात्र आता केरळ न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार वधू-वर उपस्थित नसतानाही लग्नाची नोंदणी करता येणार आहे. विशेष विवाह अधिनियमानुसार एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने असे निर्देश दिले आहेत. दोन्ही पक्षांची ओळख पटवण्यासाठी आता तंत्रज्ञानाचा वापर करता येऊ शकतो, असेही न्यायालयाने सुचवले आहे.

न्यायमूर्ती महम्मद मुश्ताक आणि कौसर एडप्पागठ यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. पक्षकारांची ओळख पटवण्यासाठी फेशिअल रेकग्निशन आणि तत्सम अन्य तंत्रज्ञानाचा वापर कऱण्यासाठी केंद्र सरकारने आदेश द्यावेत असं न्यायालयाने म्हटलं आहेय बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर कऱण्यासंबंधीही न्यायालयाने सुचवले आहे.

खंडपीठाने एकल पीठाचे न्यायाधीश पीबी सुरेश कुमार यांच्या निर्णयावर सहमती दर्शवली आहे. वधू-वर प्रत्यक्ष उपस्थित नसताना त्यांच्या विवाहाची नोंदणी करता येऊ शकणार आहे. मात्र, नोंदणी अधिकार्याला या दोघांची ओळख पटवता येणे आवश्यक असणार आहे. ऑनलाईन प्रक्रियेद्वारे ओळख कशी पटवता येईल यावर विचार करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

या सुनावणीवेळी सरकारचे म्हणणे होते की, विवाह नोंदणी करण्यासाठी वधू-वर या दोघांनीही नोंदणी अधिकार्यासमोर उपस्थित राहणे गरजेचे असणार आहे तसेच वधू किंवा वरापैकी कोणी एक विवाह नोंदणी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी असायला हवा. यामुळे परदेशातील लोकांची विवाह नोंदणी शक्य नव्हती. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी झाली तर या निर्णयाचा फायदा बाहेरच्या शहरातील तसेच देशातील जोडप्यांनाही होऊ शकणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here