मेष: मेष राशीच्या लोकांनी सर्वांशी नम्रपणे बोलले पाहिजे. राजकारणातील संपर्क क्षेत्र व्यापक असेल. काही नवीन संधी मिळण्याची चिन्हे आहेत. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशीलता दिसून येईल, त्यामुळे आज विचारपूर्वक बोला. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहारात यश मिळेल.
वृषभ : वृषभ राशीची लोकं सर्वांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. नवीन आव्हानांना धैर्याने सामोरे जा, मार्ग सुकर होईल. आज मुलांकडून प्रशंसनीय काम होईल. जमीन, मालमत्तेशी संबंधित कामे होतील. महिलांना घरगुती व्यवसाय सुरू करायचा असेल तर आजचा दिवस चांगला जाईल.
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होणार आहे. महत्त्वाचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित असेल तर ते आजच पूर्ण करा. चांगले आर्थिक नियोजन करू शकाल. आज तुम्ही प्रवासाचा आनंदही घेऊ शकता. तरुणांना नवीन नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे. घरगुती खर्चात घट होऊ शकते, ज्यामुळे काहीजण बजेटवर नियंत्रण ठेवू शकतील.
कर्क : कर्क राशीच्या लोकांना आज दिवसाची सुरुवात सामान्य राहील. तुम्ही पैशाची देवान-घेवाण करण्यात मग्न असाल. जर तुम्ही कुटुंबातील सदस्यासोबत व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ते चांगले होईल. आज वादविवादांपासून दूर राहणे योग्य राहील. कामाच्या परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. संघर्ष तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही. घरातील सदस्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न कराल.
सिंह : सिंह राशीच्या लोकांना आत्मविश्वासाने आणि कठोर परिश्रमाने प्रत्येक ध्येय गाठता येईल. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी तुम्ही बँकेकडून कर्ज घेऊ शकता. उधार दिलेले पैसे कुठेतरी परत मिळू शकतात. तुम्ही असे कोणतेही काम करू शकता, ज्यामुळे तुमच्या कुटुंबाला गौरव मिळेल. नवीन कामात भरपूर यश मिळेल. सासरच्यांशी चर्चा होईल.
कन्या : कन्या राशीच्या लोकांना संध्याकाळपर्यंत एखादी चांगली बातमी मिळू शकते. मेहनतीच्या जोरावर अवघड कामेही सहज पूर्ण होतील. वेळेवर प्रकल्प राबवा. भगवंताचे ध्यान केल्याने तुम्हाला मनःशांती मिळेल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. एखाद्या ठिकाणाहून पैसे मिळण्याची वाट पाहाल.
तूळ : तूळ राशीच्या लोकं आज नवीन ध्येय निश्चित करतील व त्या दिशेने प्रयत्न देखील सुरू करतील. काही व्यावसायिक बाबी तुम्ही हुशारीने हाताळू शकता. पैसा वाढू शकतो. कामात पूर्ण सहकार्य कराल. आज तुम्हाला हवामानाच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो. आज कोणतेही काम करताना मन शांत ठेवा. घरगुती जीवनात माविन्य जाणवेल.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या लोकांच्या कुटुंबात परस्पर सौहार्द वाढेल. व्यावसायिक जीवनात प्रत्येक बाबतीत स्पष्ट भूमिका ठेवा. आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून सर्व काही ठीक होईल. मित्रांसोबत चांगला वेळ जाईल. रागाला वरचढ होऊ देऊ नका, तर दिवस चांगला जाईल. तुमचे उत्पन्न चांगले राहील. काही लोकांना परदेशात जाण्याची चांगली बातमी मिळू शकते.
धनु: धनु राशीच्या लोकांना आज तंदुरुस्त वाटेल. तुमचा समजूतदारपणा आणि सौजन्याने प्रत्येकजण खूप प्रभावित होईल. बँकिंग क्षेत्राशी संबंधित लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. तुमचा सल्ला इतरांना उपयोगी पडेल. मनोरंजनाच्या साधनांमध्ये तुम्हाला रस असेल. पैशांच्या बाबतीत मनोरंजक ऑफर मिळू शकतात. तुमचा मुद्दा इतरांसमोर उघडपणे मांडा.
मकर : या राशीच्या महिलांसाठी आजचा दिवस शुभ आहे. प्रत्येकाच्या प्रार्थनेचा परिणाम आनंददायक असेल. तुम्हाला स्वतःला उत्साही वाटेल. रखडलेल्या कामात गती मिळणे फायदेशीर ठरेल. आज तुम्हाला मंगल कार्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नातेवाईक आणि मित्रांना भेटण्याची संधी देखील मिळेल. कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात व्यस्त राहील.
कुंभ : कुंभ राशीची लोकं आत्मविश्वासाने परिपूर्ण असतील. कुटुंबातील तरुण सदस्याच्या यशाबद्दल अभिमान वाटेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस लाभदायक असेल. तुमची मानसिक सुस्ती आज संपेल आणि तुम्हाला सर्व बाजूंनी चांगली बातमी मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्यामुळे तुम्ही खर्च करण्याच्या मनःस्थितीत असाल. नवीन कामात काही अडथळे येऊ शकतात. घाई न करता संयमाने वागा.
मीन : मीन राशीच्या लोकांनी सर्वांशी नम्रपणे बोलले पाहिजे. राजकारणातील संपर्क क्षेत्र व्यापक असेल. काही नवीन संधी मिळण्याची चिन्हे आहेत. सरकारी कामात पैसे गुंतवण्याची शक्यता आहे. व्यापार आणि पैशासाठी आजचा दिवस संमिश्र राहील. पैशाच्या व्यवहारात यश मिळेल. चांगल्या कामामुळे नोकरीत प्रगती आणि उच्च पद मिळण्याची चिन्हे आहेत.