आंबेडकरी चळवळीतील गीतकार प्रतापसिंग बोदडे यांचे हृदयविकाराने निधन

0
13

जळगाव ः प्रतिनिधी
बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा शेवटपर्यंत जपणारे, आंबेडकरी साहित्यिक चळवळीला गतिमान करणारे, वामनदादा कर्डक यांचे ज्येष्ठ शिष्य प्रतापसिंग बोदडेे (वय 74) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने काल जळगाव येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, गायक मुलगा, 4 मुली आणि चळवळीचा मोठा परिवार आहे.
ते भारतीय रेल्वेतून सेवानिवृत्त झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांना औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा झाल्याने मुक्ताईनगरमध्ये आणले होते. शुक्रवारी सकाळी प्रकृती बिघडल्याने जळगाव येथे नेण्यात आले मात्र त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी मुक्ताईनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.भीमराज की बेटी मैं तो जयभीम वाली हूँ… या गीताने महाराष्ट्रात कान्याकोपऱ्यात पोहोचलेले बोदडे यांनी असंख्य गीते लिहिली आणि गायलीही….दोनच राजे इथले गाजे कोकण पुण्यभूमीवर…, मिला मिला बुद्ध हमे भीम के स्वरुप मे… ही त्यांची गाणी विशेष गाजली.
10

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here