अमळनेर ः प्रतिनिधी
राजवड आदर्श गाव येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापिका डॉ. पाकिजा उस्मान पटेल यांची होप आंतरराष्ट्रीय वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली.
त्या उपक्रमशील शिक्षिका असून त्यांच्या शाळेत विविध उपक्रम राबविले जातात व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. मुलींच्या शिक्षणावर त्यांचा भर असतो. शेतीवाडी वरील विद्यार्थ्यांना दाखल करून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणतात. व मूल्य शिक्षणाचे धडे देत असतात. प्रत्येक विद्यार्थी हा देशाचा सुजाण नागरिक घडावा, यासाठी प्रयत्नशील असतात.
पाकिजा पटेल यांना सन २०११ मध्ये राष्ट्रपती पुरस्कार तसेच आजपर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे ७१ पुरस्कार यामध्ये मदर तेरेसा अवार्ड, सावित्रीबाई फुले पुरस्कार, महात्मा गांधी पीस अवार्ड, महाराष्ट्र रत्न पुरस्कार, ग्रेट सोशल वर्क पुरस्कार, फिलिपाइन्स, इंडोनेशिया, श्रीलंका, बांगलादेश आंतरराष्ट्रीय पुरस्कार तसेच देशभरातून १४० कोरोना योद्धा सन्मान व युरोप देशाकडून डॉक्टरेट यांचा समावेश आहे.
डॉ.पाकिजा पटेल यांनी आतापर्यंत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल आंतरराष्ट्रीय समितीने घेतली व इंटरनॅशनल वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला. शैक्षणिक क्षेत्रात कामगिरी पाहता त्यांच्यावर पुरस्कारांचा वर्षाव होत आहे. या नोंदीमुळे राजवड आदर्श गावाचे नाव जगाच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. डॉ.पाकिजा पटेल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे