जामनेर : प्रतिनिधी
गणपती नगर जामनेर येथे दैनिक योग वर्गात योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग शिक्षिका : सौ. पुष्पा अग्रवाल, सौ.अंजु पवार, सौ.माधुरी लखोटे यांनी प्राणायाम व आसनांमधून “निरोगि शरीर हाच खरा दागिना” हा संदेश दिला. त्यावेडी राष्ट्रसेविका समितिच्या जामनेर तालुका अध्यक्षा सौ.आरती देशपांडे यांचे सौ.अंजु पवार यांनी आयुर्वेदिक गुळवेल वनस्पतीचे रोपटे देऊन स्वागत केले.त्यावेडी सौ.छाया पाटील, सौ.अरुणा रोनखेडे, सौ.सुरेखा वाघ, सौ.रेखा पाटील तसेच आनंदी महिला बचत गट व गणपती नगर येथील महिला उपस्थित होत्या.
आयोजक: सौ.अंजू पुखराज पवार.
कोणत्याही दोन चांगल्या व परस्पर पूरक गोष्टी एकत्र येणे याला योग म्हणतात. व्याधीमुक्त शरीर व नियंत्रीत मन यांचा संयोग म्हणजे योग.योगशास्त्राची निर्मिति हि मुळातच व्याधी निर्माण होऊ नये यासाठी झालेली आहे. असे सौ.अंजू पवार यांनी सांगितले. या योग शिक्षिका असुन महिला व युवतींचे योग वर्ग घेतात.
