साईमत साकेगाव ता.भुसावळ वार्ताहर
साकेगाव जोगलखेडा रस्त्याने पोलीस व महसूल पथकातील कर्मचाऱ्यांनी डंपर क्रमांक एम एच 19 झेड 1644 या वाहनातून वाघूर नदी पत्रातून अवैधरित्यावाळू वाहतूक करीत असल्याचे निदर्शनात आल्याने सदर वाहन ताब्यात घेत कारवाई करण्यात आली आहे.
साकेगाव जोगलखेडा रस्त्याने पोलीस व महसूल पथकातील कर्मचाऱ्यांनी संदीप बेनीलाल परदेशी यांच्या मालकीचे वाहन क्रमांक एम एच 19 झेड 1644 या वाहनातून वाघूर नदी पत्रातून अवैधरित्या गौण खनिज भरून साकेगाव गावाच्या दिशेने वाहतूक करीत असताना साकेगाव शिवार गट नंबर १०/२ शेत जमिनी जवळ वाहन पकडण्यात आले. वाहनात अंदाजे दोन ब्रास वाळू होती, पोलीस पथकातील कर्मचारी जोगलखेडा गावाच्या दिशेने येत असताना वाहन मालक यांनी मोबाईल द्वारे वाहन चालकांना वाहनातील असलेली वाळू खाली करून वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असतांना पोलीस पथकातील कर्मचारी वाहनाजवळ येऊन वाहन तपासले असता वाहनात वाळू आढळून आली. काही वाळू खाली करण्यात आली होती.
याबाबत तहसीलदार यांना माहिती देऊन वाहनातील असलेल्या वाळू बाबत महसूल कर्मचारी पडताळणी कामी पाठविणे बाबत कळविण्यात आले त्यावरून महसूल विभागातील मंडळ अधिकारी कुऱ्हे प्र न योगिता पाटील, तलाठी साकेगाव मिलिंद तायडे, तलाठी वराडसीम नितीन केले, तलाठी सुनसगाव जयश्री पाटील, कोतवाल साकेगाव जितेश चौधरी हे घटनास्थळी पोहोचून वाहन व वाहनातील असलेल्या गौण खनिज वाळू या प्रकाराचा जागेवर पंचनामा करून वाहन चालकांचा जबाब नोंदवला. वाहन चालकाकडे सदर वाहतुकी बाबत कुठलाही परवाना अगर पावती नसल्यामुळे अवैधरित्या वाहतूक करीत असल्यामुळे वाहन मालकाच्या सांगण्यावरून वाहनातील वाळू खाली करून पडून जाण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे वाहन मालक संदीप बेनीलाल परदेशी, वाहन चालक राजेंद्र शिवराम आढाळे, सुनील नथू परदेशी आदींविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.