जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात परिवारासह राहणारी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील शिरसोली येथे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह रहिवासाला आहे. १ मे रोजी रात्री ८ वाजता मुलगी ही घरी असतांना गावात राहणारा मगन रामकृष्ण मोरे यांन अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले आहे. असा संशय पिडीत मुलीच्या वडीलांनी केला आहे.
नातेवाईक व इतर परिसरात मुलीचा शोधाशोध केली परंतू ती कुठेही आढळून आली नाही. अखेर गुरूवार ५ मे रोजी सायंकाळी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मगन मोरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे करीत आहे.