अर्थ संकल्प 2021 : विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक वाढवणार

0
18

नवी दिल्ली : केंद्र सरकार यंदा सरकारी विमा कंपनी एलआयसीचा (LIC) आयपीओही बाजारात आणणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली. अर्थमंत्र्यांनी देशातील वित्तीय संस्थांचा विकास करण्यासाठी निधीची तरतूद केली. त्यानंतर सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक वाढवणार असल्याची सांगितले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्पात देशातील सरकारी वित्तीय संस्थांचा विकास करण्यासाठी २० हजार कोटींची तरतूद केली आहे. याद्वारे सरकारी बँकांच्या विकासाकडे केंद्र सरकार लक्ष देणार आहे. याचबरोबर देशात विमा क्षेत्र वाढत चालले आहे. त्यासाठीही एक विशेष घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्यांनी विमा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक वाढवण्याच्या घोषणा केली.आतापर्यंत विमा क्षेत्रात असणारी ४९ टक्के थेट परदेशी गुंतवणुकीचा मर्यांदा आता ७४ टक्यांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामुळे विमा क्षेत्रात अधिक परदेशी गुंतवणूक होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here