वॉशिग्टन : वृत्तसंस्था
पूर्व युक्रेनच्या काही भागांत सैन्य पाठवण्याचा रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांचा निर्णय म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उघडउघड उल्लंघन’ असल्याचे सांगून, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियावर व्यापार निर्बंध लागू केले. पाश्चिमात्य देशांशी व्यापार करण्याच्या रशियाच्या क्षमतेला यातून लक्ष्य करण्यात आले आहे.
युक्रेनवर केलेल्या कारवाईबद्दल रशियाविरुद्ध अमेरिकेच्या वतीने निर्बंधांचा ‘पहिला भाग’ बायडेन यांनी जाहीर केला. दोन मोठय़ा वित्तीय संस्था, रशियाचे सार्वभौम कर्ज आणि रशियाचे उच्चपदस्थ नेते व त्यांचे कुटुंबीय यांच्याविरुद्ध जाहीर केलेल्या या निर्बंधांमुळे ‘रशियन सरकारचा पाश्चिमात्य वित्तपुरवठय़ाशी संबंध तुटेल’, असे त्यांनी सांगितले.
नाटोच्या पूर्वेकडील बाल्टिक राष्ट्रांत असलेल्या अमेरिकेच्या मित्रदेशांना ‘मजबूत’ करण्यासाठी आपण तेथे अतिरिक्त फौजा आणि लष्करी साहित्य पाठवत असल्याचेही बायडेन यांनी मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले; तथापि या फौजा ‘रशियाशी लढण्यासाठी’ गेल्या नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कच्च्या तेलाची किंमत
100 डॉलर्स पार
रशिया आणि युक्रेनमधील वाद चर्चेच्या माध्यमातून मिटवण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच मोठी घडामोड समोर आली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आहे.रशियाने युद्ध पुकारले असल्याने खनिज तेलाचे भाव 100 डॉलर प्रति बँरल पार गेले आहेत.यामुळे जगभरात इंधन महागणार आहे.
रशियाने युद्ध पुकारताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी विनाशकारी परिणाम होतील असा गर्भित इशारा दिला आहे. या हल्ल्यामुळे होणारी हानी आणि मृत्यू यासाठी रशिया एकटी जबाबदार असेल असंही ते म्हणाले आहेत. तसंच अमेरिका आपल्या सहकारी देशांसह याचं उत्तर देईल असंही म्हणाले आहेत. जग रशियाला जबाबदार धरेल असेही त्यांनी सांगितले आहे.रशियाने युद्ध पुकारताच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी विनाशकारी परिणाम होतील असा गर्भित इशारा दिला आहे.