नाशिक-मूकबधीर (स्पीच-अँड-हीअरिंग-इम्पेअर्ड अर्थात एसएचआय) असणे हा तरुणांसाठी रोजगार मिळवण्यातील मोठा अडथळा ठरत आहे. यामागील प्रमुख कारण, कामाची ठिकाणे एसएचआय कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी, पूरक ठरण्यासाठी सुसज्ज नसतात, हे आहे. २२ वर्षीय हर्षल महाजनची हीच कथा आहे. कुटुंबाला हातभार लावणे आणि आपल्या धाकट्या भावाला शिक्षणाच्या पुरेशा संधी मिळवून देणे हे हर्षलचे सर्वांत मोठे स्वप्न आहे. मात्र मूकबधीर असल्यामुळे त्याला अनेक संधी नाकारल्या जात होत्या.
नाशिकचा रहिवासी असलेल्या हर्षलला १२व्या इयत्तेत शिक्षण सोडावे लागले. त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केला पण त्याला ऐकू येत नसल्यामुळे बहुतेक ठिकाणी त्याला कामावर ठेवून घेण्यास नकार दिला गेला. दादरच्या विशेष कौशल्य शाळेतील मार्गदर्शकांकडून हर्षलने अमेझॉन इंडियाबद्दल प्रथम ऐकले. हर्षल मुंबईतील आउटबाउंड विभागात फुलफिलमेंट सेंटर सहाय्यक म्हणून कामावर रुजू झाला. अमेझॉनमध्ये काम सुरू करून हर्षलला आता एक वर्ष पूर्ण होत आले आहे आणि त्याचे आयुष्य या नोकरीमुळे खूप सुधारले आहे, असे तो सांगतो.
हर्षल त्याची आई आणि धाकट्या भावासोबत राहतो. सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या आपल्या आईच्या हातात तो दर महिन्याला अभिमानाने आपला पगार ठेवतो. आज हे तीन जणांचे कुटुंब आर्थिक हमी व सुरक्षिततेचे आयुष्य जगू शकत आहे, असे हर्षल सांगतो.
“माझ्यासारख्या लोकांना नीट नोकरी मिळणे खूप कठीण आहे. अमेझॉनमध्ये माझा मान व आदर राखला जातो. सर्वांना सामावून घेणाऱ्या कार्यसंस्कृतीमुळे सर्व कर्मचाऱ्यांना अगदी घरात असल्यासारखे वाटते. माझे कुटुंब आणि मी अमेझॉनचे ऋणी आहोत. मला जो पगार मिळतो, त्यातून मला कुटुंबाला हातभार लावता येतो आणि विशेषत: धाकट्या भावाच्या शिक्षणाचा खर्च करता येतो,” असे हर्षल महाजन सांगतो.
“येथे काम करायला खूप मजा येतो, सर्वांना सामावून घेणारे वातावरण कामाच्या ठिकाणी आहे आणि संवादात मदत करण्यासाठी येथे दुभाषी (इंटरप्रीटर) असतात,” असेही तो सांगतो.
अमेझॉनने कंपनीच्या लसीकरण कार्यक्रमामार्फत हर्षद व त्याच्या कुटुंबियांना कोविड लशीचे दोन्ही डोस मिळवून दिले, असेही हर्षद सांगतो. आपल्या सर्व संबंधितांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य देण्याच्या कंपनीच्या तत्त्वाची तो प्रशंसा करतो व त्याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करतो.
आपल्या मनुष्यबळात वैविध्य, समन्याय व समावेशकतेची जोपासना करण्यासाठी अमेझॉन इंडिया सातत्याने प्रयत्नशील आहे आणि निराळ्या दृष्टिकोनांचा येथे सन्मान केला जातो. एक समतोल मनुष्यबळ विकसित करण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट कंपनीपुढे आहे आणि यासाठी अनेक उपक्रम डिझाइन करण्यात आले आहेत. यामध्ये स्त्रिया, विकलांगतांसह जगणारे लोक, तृतीयपंथी या सर्वांसाठी प्रभावी संधी निर्माण करण्याचाही समावेश होतो. जीवनाच्या सर्व क्षेत्रातील लोकांना मदत करण्याच्या दृष्टीने आपली नवोन्मेषकारी व तंत्रज्ञानावर आधारित संसाधने आणि संरचना उपयोगात आणण्यासाठी अमेझॉन इंडिया वचनबद्ध आहे.
कोविड-१९ साथीशी संबंधित आव्हानांचा सामना सर्वांना करावा लागत असताना, अमेझॉन इंडिया आपल्या फुलफिलमेंट नेटवर्कमधील सर्वांच्या कल्याणावर आणि सुरक्षिततेवर भर देत आहे. तसेच या बाबीला खूप महत्त्वही देत आहे. अमेझॉन इंडियाने अनेक शहरांमधील आघाडीच्या आरोग्यसेवा पुरवठादारांशी भागीदारी करून घेतलेल्या लसीकरण कार्यक्रमांमध्ये, आपले सहयोगी, कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबून व्यक्तींना, २८०,००० हून अधिक लशी दिल्याचे अलीकडेच जाहीर केले आहे.