अमळनेर येथील शिंदे परिवाराने आपआपल्या घरीच पार पाडला दशक्रिया विधी

0
18

अमळनेर ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अमळनेर येथे शिंदे परिवाराने दशक्रिया विधीला वेगवेगळ्या गावी असलेल्या भाऊबंदांनी एकत्र न येता आपापल्या गावी राहत्या घरीच दहाव्याला केस देण्याचा विधी पार पाडला. अंत्यविधींच्या निमित्ताने गर्दी करणार्‍या समाजमनासमोर नवा पायंडा पडत आदर्श ठेवला आहे.
अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांच्या आजी स्मृतिशेष मखमलबाई पिराजी शिंदे यांचे मालेगाव येथे वयोवृद्धत्वामुळे ११ एप्रिल रोजी निधन झाले. त्यांच्या पश्‍चात मुले, मुली, नातवंड, भाऊबंद असा मोठा परिवार आहे. अंत्यविधीतील अंत्ययात्रा, राख सावळणे, दशक्रिया, उत्तरकार्य अशा प्रत्येक दिवशी भाऊबंद अनेकदा एकत्र येतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गर्दी होऊ नये म्हणून इतर सर्व विधींसह दशक्रिया विधीलाही शिंदे परिवारातील भाऊबंद व इतर नातेवाईक यांनी एकत्र न येता अमळनेर, वडगाव, मालेगाव, वडनेर, आदी ठिकाणी प्रत्येकाने आपापल्या राहत्या घरीच केस देत नवा पायंडा पाडला आहे.
सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, बंधू विक्रम शिंदे व चि. शिवतेज यांनी दशक्रिया विधीला मालेगाव येथे न जाता अमळनेर येथील आपल्या राहत्या घरी अंगणातच परिसरातील नाभिक अशोक ठाकरे यांना बोलावून घेत केस देण्याचा कार्यक्रम पार पाडला. कोरोना काळात आपल्या स्मृतिशेष आजीचे कार्य आहे त्या ठिकाणाहून पार पाडत शिंदे कुटूंबीयांनी समाजात एक नवा संदेश देण्याचा आदर्श प्रयत्न केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here