अमळनेर ः प्रतिनिधी
तालुक्यात तीन जिनिंगमध्ये कापूस खरेदीसाठी मोजमाप सुरू राहील, अशी ग्वाही आ.अनिल पाटील यांनी येथील कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ प्रसंगी दिली.
यावेळी व्यासपीठावर पणन संचालक संजय पवार, माजी आ. स्मिता वाघ, पणन माजी संचालिका तिलोत्तमा पाटील, जि.प. सदस्या जयश्री पाटील, पं.स.माजी सभापती शाम अहिरे, माजी पणन संचालक सुभाष चौधरी, अनिल शिसोदे, सहाय्यक निबंधक गुलाबराब पाटील, लामा जिनर्सचे विनोद कोठारी, विभागीय व्यवस्थापक ए.के.गिरमे, उपव्यवस्थापक आर.जी.होले, बाजार समिती सचिव उन्मेष राठोड, बाळासाहेब सिसोदे, यतीन कोठारी, केंद्रप्रमुख अनिल कदम आदी उपस्थित होते. कापूस पणन महासंघाचे निवृत्त कर्मचारी ए.बी.निकम यांनी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रम प्रसंगी स्मिता वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. तसेच प्रा.गणेश पवार यांनी विविध मागण्या केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले तर आभार बाळासाहेब शिसोदे यांनी मानले.
संजय पवार म्हणाले की, लामा जिनिंग मध्ये गेल्या वर्षी शुभारंभ करताना उदय वाघ यांची आठवण आली. व कापूस खरेदीबाबत उदय वाघ यांचा पहिला फोन आला होता. या आठवणींना उजाळा दिला. तसेच खरेदी १५ दिवस उशिरा झाल्याने दिलगिरी व्यक्त केली. केवळ अजित पवारांच्या माध्यमातून आ. अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने हे केंद्र सुरू झाले. त्याबद्दल पणन संचालक संजय पवार यांनी आभार व्यक्त केले. कापसाच्या प्रतवारीमुळे कापूस प्रत खराब झाली. त्यासाठी वाढीव १ हजार रुपये बोनस मिळवून देण्यासाठी पणन महासंघाच्या वार्षिक सभेत मागणी केली होती. तत्कालीन आ.गिरीश महाजन यांनी एक महिना उपोषण करत कापसाला ७ हजार क्विंटल भावाची मागणी केली होती. व ते पुढे मंत्री झाले. मात्र, पुढे कापसाच्या भावाबद्दल काही झाले नाही. यावेळी संजय पवार यांनी पणन महासंघात विदर्भाचा प्रभाव असल्याने अजित पवार यांच्याकडे पणन महासंघाच्या मागण्या मांडा. ग्रेडर संख्या ६० आहेत. कापूस खरेदी केंद्रांसाठी केंद्रप्रमुख ग्रेडर नियुक्ती करा. १ हजार रुपये बोनस मिळावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करा. सध्या खान्देशात खरेदी विक्री केंद्राची दुरवस्था आहे. त्याला ऊर्जितावस्थेत आणावी, अशा मागण्या केल्या व जास्तीत जास्त शेतकर्यांनी याचा लाभ घ्यावा.
आमदार अनिल पाटील म्हणाले की, कापूस महासंघाचे आभार मानत सातत्याने चर्चा होत होती. कोरोना काळात काहीही करून माल घ्या. यावेळी हक्काचा कापूस घ्यावा यासाठी पाठपुरावा सुरू असताना आता पर्याय संपला म्हणून थेट अजित पवारांकडे साकडे घातले. गुरुवारी निर्णय आणि शुक्रवारी खरेदी सुरू झाली. बाजार समितीच्या माध्यमातून खरेदी सुरू झाली. सूचना दिल्या, फोनवर नाव नोंदणी करताना वशिलेबाजी होणार नाही. एक हजार शेतकर्यांनी नोंदणी केली. सोमवारपासून तीन जिनिंगमध्ये कापूस खरेदी सुरू करण्यात आल्या आहेत. १५० वाहने मोजला जाऊ शकतात. या दृष्टीने शेतकर्यांचा माल मोजला जाऊ शकतो. शेवटचे बोंड मोजले जाईपर्यंत खरेदी सुरू राहील. संजय पवार यांच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाऊन मांडणार आहोत. प्रति क्विंटल एक हजार रुपये बोनस मिळावा याबाबत मागणी करू. सीसीआय मार्फत मार्केटिंग फेडरेशन मका खरेदी सुरू करण्यासाठी आग्रह केला. केंद्राकडे १५ हजार क्विंटल मका खरेदी सुरू करावी यासाठी मागणी केली होती. केंद्राने फक्त साडेचार लाख क्विंटल मका खरेदी करण्यास मान्यता दिल्याने खरेदी केंद्र बंद करण्यात आले होते. राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करत आहे. केंद्रावर अमळनेर तालुक्याचे नाव बदनाम होईल, असे गैरप्रकार होईल, असे कृत्य करू नये, असे आवाहन यावेळी आ. पाटील यांनी केले.
या जिनींगमध्ये होईल कापूस मोजमाप
येथील लामा जिनिंग, शिवशक्ती जिनिंग आणि लक्ष्मी जिनिंग अशा तीन ठिकाणी मोजमाप होईल. दररोज १५० वाहने मोजमाप करण्यात येतील. तरी शेतकर्यांनी कोणत्याही प्रकारची घाई करु नये.