अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील शिरूड फाट्याजवळ दीड लाख रूपये किंमतीचा ओलसर गांजासह तरूणाला अमळनेर पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील शिरूड फाट्याजवळ संशयित आरोपी संतोष अशोक ढिवरे रा. ताडेपुरा टाकरखेडा ता. अमळनेर हा तरूण बेकायदेशीररित्या त्याच्या सोबत कापडी पिशवीत १ लाख ५० हजार रूपये किंमतीचा १० किलो ३८६ गॅम ओलसर गांजा विक्रीसाठी आणला असल्याची गोपनिय माहिती अमळनेर पोलीसांना मिळाली. त्यानुसार, पोलीसांनी सायंकाळी ४ वाजता धडक कारवाई करत संशयित आरोपी संतोष ढिवरे याला ताब्यात घेवून चौकशी केले असता त्याच्याजवळ ओलसर गांजा आढळून आला. पोलीसांनी ओलसर गांजा हस्तगत केला आहे. याप्रकरणी पो.कॉ. सुर्यकांत साळुंखे यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संतोष ढिवरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहे.