मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख
अमरावती शहरात शिवजयंती च्यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतल्यावरून झालेल्या प्रकारचा मुद्दा आज अमरावतीचे आमदार नवनीत राणा यांनी विधानसभेत उपस्थित केला . यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल।केली आहेत त्यांच्यावर वचक राहिला नाही तर पोलीस बेछूट होतील त्यामुळे त्यांना बोलू द्या रावीरणा याना बोलू द्या .त्यानंतर रवी राणा यांनी सदनात भावना व्यक्त करत असताना अमरावती महानगर पालिकेच्या मनपा आयुक्त , अमरावती पोलीस अधीक्षक , आणि मुख्यमंत्री , गृहमंत्री यांच्या वर आरोप केले .यावेळी त्यांनी सभागृहाला सांगितले की 307 व 353 सारखे खोटे गुन्हे हे राजकीय फोन आल्याने दाखल केले असल्याचे रती सिंग यांनी त्यांना संगीतल्याचे सांगितले , त्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना या प्रकरणामुळे नाराज होत “मी फाशी घेईल , मला फाशी द्या , अश्या तीव्र भावना प्रकट केल्या .
या वेळी हरक्तीच्या मुद्द्यावर भास्कर जाधव बोलताना त्यांनी सांगितले की सन्मानीय सदस्य रवी राणा यांच्यावर दिल्लीत असतांना गुन्हा दाखल झाला त्यांचे हे म्हणेने आहे मात्र त्यांनी एखाद्या मंत्री वर नावं घेऊन बोलण्या अगोदर विधानसभा अधिनियम 35 नुसार नोटीस दिली होती का आणि दिली नसेल तर त्यांनी नाव घेऊन बोलले शब्द कामजातून काढून टाकावे असे सांगितले यावरून विधानसभा अध्यक्षांनी आदेश देत त्यांनी संगितले वाक्य कामकाजावरून काढून टाकले यावरून सदनात विरोधकांनी गोंधळ केला सरकार विरोधी घोषणा दिल्या .
यावेळी आमदार सुधीर मुंगूनटीवार यांनी रावीरणा वर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत सर्वपक्षीय आमदारांची समिती गठीत करून चौकशी करण्याची मागणी केली . या वर गृह मंत्री यांनी यावेळी उत्तर देताना सांगितले की जिल्हा अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय कुठलाही पुतळा बसवता येत नाही मात्र अमरावती मध्ये असे घडले तसेच त्या पुतळ्याची उंची ही चुकीची होती . त्यामुळे स्थानिक प्रशासनाने निर्णय घेऊन स्थानीक परिस्थिती पाहता कारवाही केली आहे. या कारवाही साठी मी किंवा मुख्यमंत्री यांनी कुठलेही आदेश दिलेले नाहीत. मात्र एखाद्या शहरात परीस्थित स्फोटक बनते त्यावेळी गृहमंत्री म्हणून तेथील परिस्थिती ची माहिती घेतली ती जवाबदारी आहे . मात्र तरी सभागृहाचे भावना लक्षात घेता कायदा सुव्यवस्था चे पोलीस महासंचालक महाराष्ट्र यांच्या कडून चौकशी करून आलेल्या अहवाल वर विरोधीपक्ष यांच्या बरोबर चर्चा करणार असल्याचे त्यांनी संगितले .