मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख
राज्यपाल अभिभाषणात गोधळ केल्या नंतर अभिभाषण न करता किंबहुना राष्ट्रगीत न होऊ देता राज्यपालांनी सभागृहातून काढता पाय घेतला . आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली . सुरवात होण्या अगोदर राज्यपाल अभिभाषण करतात मात्र या अभिभाषणात राज्यपाल सभागृहात येताच सत्ता पक्षाच्या आमदारांनी शिवाजी महाराजांच्या जयघोष केल्याच्या घोषणा दिल्या . त्यातच विरोधी पक्षाने सरकार दाऊद चे दलाल च्या घोषणा दिल्या या गोधळात राज्यपालांनी अभिभाषणाची सुरवात केली आणि काही शब्द वाचून अभिभाषणाचा शेवट केला यात सर्व गोधळात राज्यपाल सभागृहातून निघून गेले त्यानंतर राष्ट्रगीत झाले .
आरोप प्रत्यारोप अभिभाषण न करता निघून गेल्यावरून सत्तापक्ष आणि विरोधकांनी एक मेकांवर आरोप करण्यास सुरुवात केली . यावेळी आशिष शेलार यानी सांगितले की सभागृहाचे कामकाज नीट व शिस्त पध्दतीने व्हावे ही सरकारची जवाबदारी असते त्यांनीच गोधळ करून राज्यपालांचा अपमान केला आहे .
तर सत्ता पक्षाचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले की , भाजपच्या गोधळात राज्यपालांनी राष्ट्रगीत होऊ न देताच पळून गेले हे योग्य नाही असे राज्यचौ इतिहासात प्रथम झाले आहे हा राजपालांकडून राष्ट्रगीताचा अपमान आहे .
चौकट राज्यपाल निघून गेल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर राज्यपाल विरोधात निदर्शने केली यावेळी राज्यपाल हटाव राज्य बचाव च्या घोषणा देत राज्यपालांच्या निघून गेल्याच विरोध केला.