अबब ५२ लाख ९४ हजाराचा अपहार केल्याप्रकरणी बोदवड तालुक्यातील ग्रामसेवकासहित माजी सरपंचावर गुन्हा दाखल

0
17

बोदवड प्रतिनिधी 

तालुक्यातील तिस मार खां म्हणून ओळख असलेले ग्रामसेवक संदिप निकम यांच्यावर दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर अपहाराचा गुन्हा दाखल झाला आहे. शेलवड येथील ग्रामपंचायतीच्या अपहारात ग्रामसेवक संदिप निकम यांचेसहित माजी सरपंच निलेश माळी यांनाही जबाबदार धरण्यात आले आहे. यापाठोपाठ सुरवाडे बुद्रुक , विचवा व मुक्तळ या चार ग्रामपंचायतीच्या अनियमितते बाबत ५२ लाख ९४ हजार १८० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रमेश सपकाळे यांच्या फिर्यादीवरून १४ व १५ वा वित्त आयोगाच्या निधीचा स्वतःच्या फायद्याकरिता तोतयेगिरी व ठगवणुक करुन दस्तऐवज बनावटीकरण केल्याप्रकरणी भा.दं.वि. कलम ४२०,४१९,४०९,४६७,४६८,४६९,४७१ प्रमाणे गुन्हा दि.२२ सकाळच्या सुमारास ९.३० वाजता दाखल झालेला आहे.

शेलवड , सुरवाडे बुद्रुक , विचवा व मुक्तळ या ग्रामपंचायतीत दि.३०/१२/२०१८ ते दि.१७/०२/२०२१ या कालावधी दरम्यान ग्रामसेवक संदिप निकम यांनी केलेल्या अनियमिततेबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या. परंतु , सदरील ग्रामसेवकाला विस्तार अधिकारी आर.बी.सपकाळे यांचे अभय असल्याने चौकश्या टेबलवर धूळखात पडुन राहिल्या. त्यामुळे आदेशाचे अनुपालन न झाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.पंकज आशिया यांनी गटविकास अधिकारी व ग्रामपंचायत विभाग विस्तार यांना शिस्तभंगाच्या कार्यवाहीची तंबी देताच ग्रामसेवक संदिप निकम यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.

ग्रामसेवक संदिप निकम यांच्यावर झालेल्या कार्यवाहीने समाधानी नाही. शेलवड येथे दलित वस्ती दिड लाख,१४ वा वित्त आयोग ४० लाख ,स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सार्वजनिक ६ लाख व वैयक्तिक शौचालय ४५ लाख, ग्राम निधी सह किमान १ कोटी रुपयांचा अपहाराची चौकशी बाकी आहे. सदरील अपहाराचे पुरावे सादर करून सुध्दा चौकशीस विलंब होत असल्याची प्रतिक्रिया तक्रारदार ग्रामपंचायत सदस्य शेलवड दिपक माळी यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here