अत्याचारातील संशयितावर कठोर कारवाई करा

0
24

जळगाव : प्रतिनिधी
अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या संशयितांवर कठोर कठोर कारवाई करण्यात यावी, अश्या मागणीचे निवेदन मुस्लीम समाजातर्फे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देण्यात आले.
निवेदनात नमूद आहे की, शिरसोली गावातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातीलच २६ वर्षीय आरोपी साबीर शेख जहुर या इसमाने अत्याचार केल्यामुळे सदरची पिडीता ही गर्भवती झाली असून या आरोपी विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी साबीर शेख जहुर याने केलेल्या कृत्यांबाबत त्याचे विरूध्द तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करण्यात येवून कडक शासन करण्यात यावे, जेणेकरून भविष्यात या प्रकारचे कृत्य करण्याची कोणी हिंमत करणार नाही. चाळीसगांव पो.स्टे. अंतर्गत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी १३ दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. तसेच सरकारी वकील व आपल्या सहकार्यायाने आपण त्या मुलीला ३० दिवसांत न्याय मिळवून दिला. तसेच या पिडीत अल्पवयीन मुलीस सुध्दा त्वरीत न्याय द्यावा, आरोपी साबीर शेख जहुर विरुध्द कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी केली आहे.
निवेदनात मोहम्मद हाजी समसोद्दिन, सय्यद हाजी उस्मान, दस्तगीर शेख सुभान, जय निद्दिन शे निजमोड्डीन, रफीक हाजी गुलाम, नजीम शेख लू कमान, शरीफ शेख अब्दुल, सलीम शेख मोहम्मद, रहीम शेख कासम, फिरोज शेख मज्जित, मुदस्सर शेख बशीर, असलम शेख इलीयास, सलाउद्दीन शेख निजामुद्दीन, तोफिक शेख शकी, फिरदोस युनूस खाटीक, वाहिद शेख इस्मईल, आरिफ शेख सुभेदार, निजामुद्दीन हाजी समर द्दीन, टोफीक शेख फारुख यांच्या सह्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here