अतिरिक्त भरनियमन तत्काळ बंद करा:- शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी

0
52

लोणार(गुलाब शेख)

महावितरणकडून रात्री बेरात्री केले जाणारे अतिरिक्त भरनियमन तत्काळ बंद करा , अशी मागणी शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी केली आहे . भागात गेल्या पंधरा दिवसांपासून लोणार शहरात तसेच ग्रामीण महावितरणकडून मनात आले तसे 3 ते 4 तासाचे अतिरिक भारनियमन सुरु केले आहे .

यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे .कडक उन्हाळा असून रमजानचा महीना सुरु आहे . मुस्लिम बांधव संध्याकाळी रोजे सोडतात .त्यावेळी भारनियमन केल्या जाते ते करण्यात येऊ नये सध्या रामनवमी , हनुमान जयंती , महावीर जयंती , डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती , असे हिन्दु मुसलीमचे सन आहेत . , जिल्ह्यात कुठेही भारनियमन सुरु नसतांना केवळ लोणार येथे भारनियमन करण्याचा महावितरण कंपनीचा आग्रहकशासाठी , असा प्रश्न नंदकिशोर मापारी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे . यापुढे नियमा पेक्षा अधिक भरनियमन केल्यास लोणारचे 132 केव्ही सबस्टेशनला कुलुप ठोकण्याचा ईशारा दिला आहे .

शहरावर टाकण्यात आलेला अतिरिक्त भार त्वरित कमी करा , यासह रात्रीच्या वेळी करण्यात येणारे अतिरिक्त भारनियमन बंद करुन ते सकाळी दोन तास करून शहराचे भरनियमनचे वेळा पत्रक बदलण्यात यावे , अशी मागणी ही नंदकिशोर मापारी यांनी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here