Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»छत्रपती संभाजी नगर»अजितदादांनी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी उचलताच वनमंत्री मुनगंंटीवार-मुख्यमंत्री शिंदेंची चलाखी
    छत्रपती संभाजी नगर

    अजितदादांनी ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी उचलताच वनमंत्री मुनगंंटीवार-मुख्यमंत्री शिंदेंची चलाखी

    Kishor KoliBy Kishor KoliSeptember 17, 2023Updated:September 17, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था

    गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, टीका-प्रतिटीका, टोमणे-प्रतिटोमणे यांची मालिका सुरु आहे. विशेषत: ठाकरे गट आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक लढाई रंगताना दिसते.दोन्ही बाजूचे नेते एकमेकांवर खोचक आणि डिवचणाऱ्या शैलीत टीका करत असतात. या सगळ्यातून अनेकदा मजेशीर प्रसंगही उदभवतात.असाच काहीसा प्रकार रविवारी छत्रपती संंभाजीनगर येथे पाहायला मिळाला.
    छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील वाघिणीने नुकताच तीन बछड्यांना जन्म दिला होता.यापैकी एक बछडा दुर्दैवाने दगावला होता मात्र, उर्वरित दोन बछडे हे सुखरुप असून त्यांच्या नामकरणाचा कार्यक्रम रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांंच्या हस्ते चिठ्ठी काढून या बछड्यांचे नामकरण करण्यात आले मात्र या नामकरणापेक्षा योगायोगाने घडलेल्या एका वेगळ्याच प्रसंंगाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
    वाघांच्या बछड्यांचे नामकरण करण्यासाठी कार्यक्रमस्थळी चिठ्ठ्यांनी भरलेली दोन काचेची पात्रे ठेवण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासमोरील काचेच्या भांड्यातून पहिली चिठ्ठी उचलली.त्यामध्ये ‘श्रावणी’ असे नाव लिहले होते. त्यानुसार वाघाच्या मादीचे नामकरण ‘श्रावणी’ असे करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी,’श्रावणात जन्माला आली म्हणून श्रावणी’, अशी शाब्दिक कोटीही केली.
    यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यासमोरील काचेच्या भांंड्यातील चिठ्ठी उचलली. अजित पवारांनी उचललेल्या चिठ्ठीत ‘आदित्य’ हे नाव आले. हे नाव वाचताच अजित पवारांच्या चेहऱ्यावर हास्याची छटा पसरली.त्यांनी हसतहसतच ही चिठ्ठी शेजारी उभे असलेले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दाखवली. कदाचित राजकीय कारणामुळे असेल, सुधीर मुनगंटीवार यांनी कोणाच्याही लक्षात येणार नाही, या अपेक्षेने वाघाचे नामकरण ‘आदित्य’ असे करण्यास नकार दर्शविला.एव्हाना हा प्रकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही लक्षात आला. एकनाथ शिंदे यांंनी चपळाई दाखवत अजित पवार यांच्यासमोरील काचेच्या पात्रातून आणखी एक चिठ्ठी उचलली. त्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये आपापसात थोडीफार चर्चा झाली. यानंतर अजित पवार यांनी पुन्हा एकदा काचेच्या पात्रातून चिठ्ठी उचलली. त्यामध्ये ‘विक्रम’ असे नाव आले.त्यानुसार दुसऱ्या बछड्याचे नामकरण विक्रम असे करण्यात आले. एकनाथ शिंदे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी चलाखीने ‘आदित्य’ नावाची चिठ्ठी बाजूला सारली मात्र, त्याठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यांमध्ये हा सर्व प्रकार टिपला गेला. त्यामुळे आता यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येणार, हे पाहावे लागेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Kishor Koli

    Related Posts

    Chhatrapati Sambhajinagar:प्रचारादरम्यान खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, शहरात तणाव

    January 7, 2026

    Ram Ghodke Appointed : कलावंत मानधन निवड समितीच्या सदस्यपदी राम घोडके

    October 8, 2025

    artificial intelligence courses : शेती, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, आरोग्य, नगरविकासासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचे अभ्यासक्रम तयार करा- अजित पवार

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.