अजंठा लेणी एक जागतिक अनमोल ठेवा – डॉ. पी. एस.प्रेमसागर

0
26

मुक्ताईनगर : प्रतिनिधी
जागतिक वारसेचे जतन व्हावे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन अजंठा लेणीचे संवर्धन करायला हवे कारण अजंठा लेणी एक जागतिक अनमोल ठेवा असल्याचे प्रतिपादन डॉ. पी. एस. प्रेमसागर यांनी केले. ते मुक्ताईनगर येथील श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालय व प्राध्यापक प्रबोधनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अजंठा लेणी एक जागतिक वारसा’ या विषयावरील  व्याख्याना प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर एच. ए.महाजन आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे  महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए. पी. पाटील  या कार्यक्रमास उपस्थित होते.
डॉ. प्रेमसागर यांनी आपल्या व्याख्यानातून जागतिक ख्यातीचे पर्यटन स्थळ ‘अजंठा लेणी’ विषयी आपले अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानातून त्यांनी अजंठा लेणी मधील चलचित्रातील सूक्ष्म निरीक्षण, व सुंदर कलाकृती याविषयी सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना समजावून सांगितले.
ते पुढे म्हणाले की, प्राचीन काळापासून भारतात सहिष्णुता व धर्मनिरपेक्षता नांदत होती. सातवाहन कालखंड, वाकाटक संस्कृती,  मोर्य वंश या  राजशही मध्ये सहिष्णुता पहावयास मिळते असे . प्राचीन काळामध्ये अजंठा येथील बुद्ध लेण्या तयार करण्यासाठी या राजवटीने अनमोल सहकार्य केले हेही निदर्शनात आणून दिले.  आज घडीला भारतामध्ये या  जागतिक वारसेचे जतन व्हावे यासाठी सर्वांनी एकत्र येऊन या अजंठा लेणीचे संवर्धन करायला हवे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
प्रसंगी अध्यक्षीय भाषणामध्ये प्रोफेसर डॉ. एच. ए. महाजन यांनी अजंठा लेणीच्या जातक कथेविषयी कथा सांगून उद्बोधन केले. व येणाऱ्या पिढीलाही या जागतिक वारसेचा, कलाकृतीचा आनंद घेता यावा. यासाठी सर्व धर्मवासीयांनी सहकार्य करायला हवे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कृष्णा गायकवाड, प्रास्ताविक डॉ. सी. ए. नेहते तर आभार डॉ. रंजना झिंजोरे यांनी मांडले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रंथपाल एन.जी. सरोदे डॉ. सी. जे. पाटील यांनी अथक परिश्रम घेतले. व या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here