जळगाव : प्रतिनिधी
अखिल भारतीय साहित्य परिषद ही सर्व भारतीय भाषांच्या संवर्धनासाठी आणि समृद्धीसाठी कार्यरत आहे. जळगावातही साहित्य क्षेत्रात विविध उपक्रम राबवणे व परिषदेची व्याप्ती वाढवण्यासाठी शहर कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अध्यक्षपदी साहित्यिक सुधीर ओखदे यांची निवड झाली.
उर्वरित कार्यकारिणीत कार्याध्यक्ष सुहास देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. भालचंद्र देशमुख, उपाध्यक्षा प्रा. संध्या महाजन, सचिव विशाखा देशमुख, सहसचिव वैशाली पाटील, कार्यक्रम प्रमुख प्रा. संदीप शिंदे, प्रसिद्धी प्रमुख मनोज महाजन, सदस्य प्रा. श्यामकांत बाविस्कर, विलास देशमुख, ज्योती पाटील, प्रा. मुक्ती जैन, नितीन मटकरी, शरद पाटील, मार्गदर्शक डॉ. सुभाष महाले, प्रा. प्रकाश महाजन व स्वानंद झारे असतील.
घोषणा झाल्यावर पुढील कार्याची रचना या संदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीला प्रांत प्रतिनिधी म्हणून देवगिरी प्रांत महामंत्री प्रा. विजय लोहार हे उपस्थित होते. समितिची रचना देवगिरी प्रांत अध्यक्ष श्रीकांत उमरीकर यांच्या मार्गदर्शनाने कार्याध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम पाटील व प्रतिनिधी यांनी केली. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे प्रदेश अध्यक्ष ज्येष्ठ लेखक प्रा. प्रवीण दवणे व कार्याध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनाने आगामी काळात साहित्य परिषदेचे कार्य करण्यात येईल अशी भावना सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी कार्यक्रमात व्यक्त केली.