जळगाव : प्रतिनिधी
अखिल भारतीय साहित्य परिषद तर्फे मराठी भाषा गौरव दिन दिनांक 27 रविवार रोजी “अखिल भारतीय साहित्य परिषद, शाखा जळगाव व “संस्कार भारती, जळगाव तसेच “कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
भाऊंच्या उद्यानातील अम्फी थिएटर येथे झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा. मनिष जोशी होते प्रा. शरदचंद्र छापेकर उपस्थित होते. उद्घाटक म्हणून ज्येष्ठ कवयित्री सौ. मायाताई धुप्पड़ व वक्ते म्हणून कार्यक्रमाची सुरुवात “कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस माल्यार्पणाने झाली. नंतर प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभासापचे संयोजक प्रा. डॉ. पुरुषोत्तम पाटील यांनी केले. माय मराठीच्या या सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले गेले, कार्यक्रमाची सुरुवात कुसुमाग्रजांचे प्रसिद्ध गीत “वेडात मराठी वीर दौडले….“ ने झाली गायिका अपूर्वा बारस्कर हिने गीत सादर केले व दिलीप चौधरी, नीळकंठ कासार, मोहन रावतोळे, विशाखा देशमुख व स्वरमयी देशमुख इत्यादिनी समुह स्वर दिला. तसेच “काही बोलायाचे आहे.. व “हासरा-नाघरा…. ही गीतं क्रमशः नीळकंठ कासार व .स्वरमयी देशमुख हिने सादर केले. प्रा. विजय लोहार यांनी कणा गाभारा,वर्षा उपाध्ये हिने रही प्रेम कर भिल्ला सारखं, चंचल धांडे हिने स्वात्यंत्र देवीची विनवणी, मीनाक्षी ठाकूर हिने प्रेमयोग कविता सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. स्वराज्य कला पथकातर्फे स्वातंत्र्याची गौरवगाया ही नाटिका सादर करून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे दृष्यच जणु उपस्थितांच्या डोळ्यासमोर उभे केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विशाखा देशमुख यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे सुभाष पवार अभासापचे साहित्यिक प्राचार्य सुभाष महाले साहित्यिक सुधीर ओखदे प्रा. विजय लोहार प्रा. शामकांत बाविस्कर प्रा. बी. जी देशमुख प्रा. प्रकाश महाजन, वैशाली पाटील शरद पाटील, तुषार वाघुळदे, मनोज चौधरी व संस्कार भारती चे प्रांत पदाधिकारी श्री मोहन रावतोळे, नीलकंठ कासार, दुष्यंत भरत लढ़े व पियुष रावळ यांनी प्रयत्न केले. जोशी, चिंतामण पाटील, आभार दिलीप चौधरी यांनी मानलेे.