अखतवाडे येथे उर्दु शाळेच्या बांधकामाचे उद्घाटन

0
26

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील नगरदेवळा येथून जवळच असलेल्या अखतवाडे येथे जिल्हा परिषदच्या माध्यमातून उर्दू शाळेसाठी १६ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून आज या बांधकामाचे उद्घाटन शिवसेना जिल्हापरिषद गटनेते रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
आखतवाडे येथे जिल्हा परिषद उर्दु शाळेची इमारत जीर्ण झाली होती. त्यासंदर्भात ग्रामस्थांनी वारंवार ती शाळा नवीन बांधण्यात यावी यासाठी रावसाहेब पाटील यांच्याकडे मागणी लावून धरली होती. त्यामुळे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हापरिषद सदस्य रावसाहेब पाटील यांनी त्यासंबंधी पाठपुरावा करून त्या शाळेसाठी १६लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला असून जुनी उर्दूशाळा निर्लखीत करून नवीन शाळेचे बांधकाम उदघाटन आज रोजी त्यांच्या हस्ते पार पडले.

त्यावेळी जिल्हापरिषद व जिल्हा नियोजन समिती सदस्य रावसाहेब पाटील, सरपंच सावित्रीबाई धनगर, उपसरपंच आनंदसिंग परदेशी, माजी सरपंच धनसिंग गढरी, सदस्य दीपक गढरी, कल्पना परदेशी, प्रकाश गढरी, निजाम खा. पठाण, सफायोद्दीन शेख, अकबर पठाण, राहुल राजपूत, जमशेर पठाण, प्रवीण राजपूत, मुख्याध्यापक जावेद शेख, जितेंद्र राजपूत, बालू राजपूत, पंकज गढरी, साबीर शाह, ग्रामसेवक शरद सोमवंशी यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here