भुसावळ ः प्रतिनिधी
माजी आमदार तथा खासदार स्व.हरीभाऊ जावळे यांची 16 जून रोजी असलेल्या द्वितीय पुण्यतिथी निमित्ताने अंतर्नाद प्रतिष्ठान भुसावळच्या वतीने यावल तालुक्यातील वाघळूद येथील जिल्हा परिषद शाळेत 30 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.यात अक्षरमित्र पुस्तक, पाटी, वही, पेन्सिल, खोडरबर हे साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग.स.संचालक योगेश इंगळे हे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अजय पाटील, उपाध्यक्ष ज्योती पाटील, अंतर्नादचे सदस्य जीवन महाजन उपस्थित होते.
स्व.हरिभाऊ जावळे यांची पुण्यतिथी सामाजिक बांधिलकी जोपासून उपक्रम राबवित वंचित विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली आहे.हे समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन ग.स.संचालक योगेश इंगळे यांनी केले.स्व.हरिभाऊनी त्यांच्या कार्यकाळात सर्वच घटकातील लोकांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला होता.त्याच विचाराने आणि संस्कारानी प्रेरित होऊन अंतर्नाद प्रतिष्ठानने हा उपक्रम राबविला,अशा भावना अंतर्नादचे सदस्य जीवन महाजन यांनी व्यक्त केल्या.
या प्रसंगी वाघळूद जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक अमितकुमार पाटील,सहकारी दीपक वारके, अमित चौधरी, सचिन पाटील, निखिल सपकाळे, शुभांगी धनगर आणि अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील आदींची उपस्थिती होती.



