अंगणवाडी सेविकांना मिळणार मोबाईल

0
23

मुंबई : प्रतिनिधी
यंदाच्या अर्थसंकल्पामधून २०२२-२३ वर्षासाठी महिला आणि बालकल्याण विभागासाठी २ हजार ४७२ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून. एकात्मिक बाल विकास योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या करण्यासाठी e – शक्ती योजनेतून राज्यातील एक लाख ३० हजार अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षक महिलांना मोबाईल देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली .  त्याबरोबरच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात २५०० रुपयांपर्यंत वाढ करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली आहे.
-0 ते 18 वयोगटातील बालकांचे पालन करणाऱ्या संस्था किंवा कुटुंबाला दर महिन्याला देण्यात येणाऱ्या प्रति बालक अनुदानात 1125 रु वरून 2500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे.
जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण निधीपैकी तीन टक्के निधी महिला व बाल विकास योजनेसाठी राखून ठेवण्याचा येणार असून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला व बाल भवन उभारण्यात येणार आहे . तसेच नागरी भागातील अति तीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्राच्या धर्तीवर नागरी बालविकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा करण्यात आली असून सन 2022-23 वर्षासाठी महिला व बालकल्याण विभागासाठी 2 हजार 472 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here