६ जानेवारी २०२२ पत्रकार दिन साध्या पद्धतीने साजरा करणार

0
15

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा पत्रकार संघात पत्रकार दिन 6 जानेवारी रोजी धूम धडाक्यात साजरा होतो. परंतु गेल्या २ वर्षापासून कोरोनामुळे या कार्यक्रमावर बंधने आली आहेत.

पत्रकारितेतले महानुभव यांना प्रमुख वक्ते म्हणुन वैचारिक मेजवानी जिल्ह्यातील सारे पत्रकारांना दिली जाते. या वर्षी पत्रकार दिन मर्यादित स्वरूपात शासनाने जी नियमावली जाहीर केली आहे त्या अनुषंगाने (कोरोना 3 री लाट) मर्यादित स्वरुपात 6 जानेवारी 2022 गुरुवार रोजी सकाळी 10. 30 वा. जळगाव जिल्हा पत्रकार संघात प्रत्येकाने मास्क लावून, ठराविक अंतर ठेवुन कार्यक्रम होणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघाने देखील असाच शासनाने दिलेल्या नियमावलीत असाच कार्यक्रम साजरा करावा. निर्बंध उठल्यावर जिल्हा पत्रकार संघा तर्फे कार्यक्रम घेण्यात येतील त्यात प्रामुख्याने ज्येष्ठ पत्रकार मानधन संदर्भात आवाज उठविला जाणार आहे तसेच पत्रकारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत 1) अधिस्वीकृती पत्रिका ग्रामीण भागातील पत्रकारांना मिळाला पाहिजे 2) दैनिक व साप्ताहिक यांचे अनेक प्रश्न आहेत 3) छायाचित्रकार यांचे प्रश्न, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया – सोशल मीडिया असे अनेक प्रश्नांना वाचा फोडणे असे अनेक प्रश्न आहेत. निर्बंध उठल्यावर पत्रकार संघ कार्यक्रम आयोजित करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here