यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात ३७ वर्षीय तरुणाला जुन्या वादातून तीन जणांनी लाकडी दांड्याने मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. या प्रकरणी यावल पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तालुक्यातील शिरागड येथील तरूणाला जुन्या वादातून तीन जणांनी लाकडी दांड्याने मारहाण करून कुऱ्हाडीने जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील शिरागड येथील योगराज शामराव साळुंखे (वय-३७) रा. शिरागड ता. यावल जि.जळगाव हा तरूण शेती करून कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतो. १ जानेवारी रोजी गावातील काशिनाथ अण्णा साळुंखे याने योगराज याला शिवीगाळ केली. याचा जाब विचारला. याचा राग आल्याने सकाळी ७ वाजता आण्णा सदू साळुंखे, कानिशाथ अण्णा साळुंखे आणि प्रमोद अण्णा साळुंखे यांनी लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यात योगराजच्या डोक्याला जखमी झाली. तर प्रमोद साळुंखे याने कुऱ्हाडीने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी योगराज साळुंखे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सिकंदर तडवी करीत आहे.