Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»हॉटेल कशी चालवतो …. बघतो….म्हणत शिवीगाळ करत मालकास जबर मारहाण
    क्राईम

    हॉटेल कशी चालवतो …. बघतो….म्हणत शिवीगाळ करत मालकास जबर मारहाण

    SaimatBy SaimatMarch 4, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनीधी
    हॉटेल मालकाच्या परवानगीविना सीसीटीव्ही फुटेज तपासणी करुन हॉटेल मालकाला दमदाटी, शिवीगाळ तसेच त्याच्या नातेवाईकाच्या डोक्यात लाकडी दांडके मारुन जबर मारहाण करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला एकुण तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हमाल मापाडी संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेविकेचे पती धुडकू सपकाळे यांच्यासह त्यांच्या दोघा साथीदारांविरुद्ध हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
    जळगाव औरंगाबाद रस्त्यावर हॉटेल काशिनाथ नजीक महेश विष्णू रडे यांचे प्रभात रेस्टॉरंट आणि भरीत सेंटर आहे. या हॉटेलचे कामकाज बघण्यासाठी महेश रडे यांना त्यांचे मेहुणे हेमंत पाटील हे मदत करत असतात. ३ मार्च रोजी हॉटेल मालक महेश रडे यांच्या गैरहजेरीत धुडकू सपकाळे व इतर तिघे जण हॉटेलमधे आले होते. हॉटेलमधील कर्मचा-यांवर दडपण टाकून त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. तुम्ही यांना सीसीटीव्ही फुटेज का चेक करु दिले अशी विचारणा यावेळी आलेले हॉटेल मालक रडे यांनी आपल्या कर्मचा-यांना केली. आपल्याबद्दल कर्मचा-यांना विचारणा केल्याचे बघून धुडकू सपकाळे यास राग आला. तु हॉटेल कशी काय चालवतो, तुझ्या हॉटेलची तोडफोड करु अशी धमकी देत धुडकू सपकाळे व त्याचे साथीदार हॉटेलच्या बाहेर निघून गेले.
    काही वेळाने धुडकूने फोन करुन दुसरे दोन जण बोलावून घेतले. यावेळी सुरु असलेल्या भांडणाचा आवाज ऐकू आल्याने हॉटेल मालक महेश रडे यांचे मेहुणे हेमंत पाटील धावत आले. त्यांनी काय झाले म्हणून महेश रडे यांच्याकडे विचारणा केली. त्याचवेळी धुडकूच्या दोघा साथीदारांनी लाकडी दांडक्याने हॉटेलमधील दोघा कर्मचा-यांना मारहाण सुरु केली. महेश रडे व त्यांचे मेहुणे हेमंत पाटील यांनी या मारहाणीला हस्तक्षेप सुरु केला. त्याचवेळी धुडकूच्या एका साथीदाराने हेमंत पाटील यांच्या डोक्यात लाकडी दांडका जोरात हाणला. या हल्ल्यात हेमंत पाटील जखमी झाले.
    दरम्यान धुडकू सपकाळे यांची महेश रडे यांना शिवीगाळ सुरु होती. शिवीगाळ व मारहाणीचा प्रकार केल्यानंतर धुडकू सपकाळे व त्याचे दोघे साथीदार हॉटेलमधून निघून गेले. जखमी हेमंत पाटील यांना तातडीने एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. याप्रकरणी हॉटेल मालक महेश रडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास हे.कॉ. विजय पाटील करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Nashik Crime : थरारक घटना! नाशिकमध्ये भरदिवसा महिलेकडून तरुणाचा खून; आधी दगड, मग कोयत्याने सपासप वार

    April 14, 2026

    प्रेमाचे नाटक, शोषणाचा खेळ! अमरावतीतील धक्कादायक प्रकरण उघड

    April 14, 2026

    सोने-चांदी दरात चढ-उतार; जळगाव सराफ बाजारात सध्या काय भाव?

    April 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.