हद्दपार गुन्हेगारांचा सतत खुलेआम वावर कसा?

0
5

जळगाव, विशेष प्रतिनिधी । शहरात चोर्या, घरफोड्या ,चेन ओढून पळणे, मोबाईल हिसकावून पळणे आदी घटनांचा नित्यक्रम सुरूच असतांना गुन्हेगारी ,तलवार घेऊन दहशत माजविणे,गावठी पिस्तुल-रिव्हॉल्वर बाळगणे आदी घटना नित्यनेमाने घडत आहेत. त्यातच हद्दपारीची कारवाई करण्यात आलेले गुन्हेगार खुलेआम शहरात वावरत असल्याचेही सातत्याने समोर येत आहे.तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न वेशीला टांगला गेला काय?त्याचबरोबर आपल्या विविध पोलीस ठाण्यातील डीबी स्कॉडचे तसेच एलसीबीचे कार्यक्षम पोलीस करतात काय?असे प्रश्न उपस्थित होणे अगदी साहजिक आहे.आणि हे सारे घडत असल्याने आपले शहर गुन्हेगारी आणि गुन्हेगार मंडळींसाठी पोषक आहे अशी चर्चा रंगत आहे.

अलीकडे पोलिसांकडून नागरिकांना सूचित व सावध करण्यात आले आहे. ते असे की,आपले किमती मोबाईल सांभाळा, विशेष करून महिलांसाठी ही सूचना अगत्याची सांगण्यात आली आहे.हे सांगतांना नेमक्या कोणत्या रस्त्यावर सावध राहावे ,मोबाईल सांभाळा असेही सांगून टाकण्यात आले आहे.जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अनेक शासकीय कार्यालये असलेल्या मोक्याच्या व प्रचंड रहदारी असलेल्या रस्त्यावर,जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय असणार्या रस्त्यावर तसेच काही कॉलन्यातील रस्त्यावर अलीकडे हातातील मोबाईल फोन हिसकावन पळवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.अशाच ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोन साखळ्या,मंगळसूत्र किंवा सोनपोत ओढून पळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर पोलिसांची सूचना महत्वाची आहे.पण …

नागरिक व महिलावर्गाला सावधगिरी बाळगण्याची सूचना देत असतांनाच अशा घटना रोखण्याचे काम पोलीसदादा किती समर्थपणे करीत आहेत,याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.कारण अशा घटनांपासून सावध राहण्याची नागरिकांची जबाबदारी आहे हे कोणी नाकारणार नाही मात्र त्यावर प्रतिबंध घालण्याचे, त्या घटना रोखण्याचे काम तर पोलिसांचे आहे ना.तशा घटना घडणार्या ठिकाणांची माहिती पोलिसांना आहे ,मग त्या-त्या ठिकाणांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले तर चोर-उचक्यांना नक्कीच धाक बसणार आहे.

दुसरीकडे शहरातून मोबाईल सह किरकोळ रक्कम चोरी केल्याचे सकाळच्या सुमारास उघडकी आले. तसेच तिजोरी देखिल तोडल्याचे निदर्शनास आले मात्र यातून किरकोळ रक्कम चोरी गेल्याचे देखिल निदर्शनास आले आहे. घटनेची माहिती कळताच शहर पोलीस ठाण्यात सदर घटनेची माहिती कळविण्यात आली असता अधिकारी, कर्मचार्यानी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

….सिसिटीव्ही फुटेजमध्ये चोरटा कैद
दरम्यान शोरूममध्ये रात्रीच्या सुमारास प्रवेश करून चोरट्याने केलेल्या चोरीचा घटनाक्रम येथील सिसिटीव्ही कॅमेर्यात कैद झाला आहे. यामुळे चोरट्याची ओळख पटण्याची शक्यता पोलीस सुत्रांतून वर्तविली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here