हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडेंच्या मुलाला अटक

0
2

पिंपरी चिंचवड :  प्रतिनिधी

हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी अखेर पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे ( Anna Bansode) यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. रत्नागिरीतील पावसमधून सिद्धार्थ बनसोडे(Siddharth Bansode) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तानाजी पवार (Tanaji Pawar) यांच्या कंपनीतील कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आमदार पुत्राला पकडण्यात होत असलेल्या विलंबामुळे पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्यावर राजकीय दबाव तर नाही ना, अशी चर्चा सुरु होती.

 

पिंपरी चिंचवडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणातील आरोपी तानाजी पवारने उलट आमदार पुत्र सिद्धार्थ बनसोडे आणि त्याच्या साथीदारांवरच अपहरण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये सिद्धार्थ बनसोडेवर गुन्हा दाखल करण्यात आला. तानाजी पवार यांच्या कंपनीकडूनही सिद्धार्थवर कर्मचाऱ्याला मारहाण आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलीस सिद्धार्थ बनसोडेचा शोध घेत होते. अखेर रत्नागिरी जिल्ह्यातील पावसमधून त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे ११ मे रोजी दुपारी घुसले होते. त्यानंतर दोघा कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडी टॉमीसारख्या घातक शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, हे कर्मचाऱ्यांनी न सांगितल्याच्या रागातून आमदारपुत्र आणि पीएसह दहा जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here