स्टाफ सिलेक्शनकडून सीजीएल परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

0
5

नवी दिल्ली, वृत्तसंस्था । स्टाफ सिलेक्शन कमिशननं कंबाइंड ग्रॅज्युएशन लेवल म्हणजेच सीजीएल 2020 च्या टीयर 1 च्या परीक्षांच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एसएससीनं बुधवारी एक नोटिफिकेशन जारी करुन सीजीएल आणि सीएचएसएल परीक्षाचा निकाल 11 डिसेंबर रोजी जाहीर होणार असल्याची घोषणा केली आहे. सीजीएल परीक्षा 2020 टियर 1 चं आयोजन 13 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून कंबाईंड ग्रॅज्युएशन लेवल सीजीएल 2020 च्या टीयर 1 परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. आयोगाकडून लवकरच अंतिम उत्तर तालिका जाहीर केली जाणार आहे. 11 डिसेंबरला टीयर 1 च्या निकालामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना टीयर 2 ची परीक्षा द्यावी, लागणार आहे.

6506 पदांसाठी भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशननं जारी केलेल्या नोटिफिकेशनुसार 13 ते 24 ऑगस्ट दरम्यान परीक्षेचं आयोजन केलं करण्यात आलं आहे आहे. एकूण 6506 पदांसाठी सीजीएल परीक्षा आयोजित करण्यात येत आहे. पहिल्या टीयर मधील उत्तीर्ण उमेदवार दुसऱ्या टीयरसाठी पात्र ठरतील.

परीक्षेचं स्वरुप
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सीजीएलच्या टियर 1 परिक्षेत 100 प्रश्न विचारले जातात. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित कऱण्यात आली होती. यामध्ये चुकीच्या उत्तरासाठी निगेटिव्ह मार्किंग देखील केलं जातं. सामान्य ज्ञान, जनरल इंटेलिजन्स, इंग्रजी, गणितीय क्षमता यावर प्रश्न विचारले जातात. प्रत्येक विभागावर 25-25 प्रश्न विचारले जातात.

कोणत्या पदांवर भरती होणार?
सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी अन्वेषण ब्यूरो, सहायक विभाग अधिकारी रेल्वे मंत्रालय, सहायक विभाग अधिकारी परराष्ट्र, सहाय्यक इतर विभाग, आयकर निरीक्षक सीबीडीटी, निरीक्षक केंद्रीय उत्पादन शुल्क, निरीक्षक प्रतिबंधक अधिकारी, उपनिरीक्षक सीबीआय, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी महसूल विभाग, निरीक्षक टपाल विभाग, सहाय्यक इतर मंत्रालय या पदांसाठी परीक्षा आयोजित केली जाणार आहे.

सीडॅक पुणे येथे 259 पदांवर भरती
पुणे: सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अ‌ॅडव्हान्समेंट म्हणजेच सीडॅकच्या वतीनं पुणे येथील विविध पदांसाठी पदभरती जाहीर केली आहे. पात्र उमदेवार सीडॅकच्या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करु शकतात. प्रोजेक्ट इंजिनिअर्स, प्रोजेक्ट असोसिएट आणि प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकूण 259 पदांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 25 सप्टेंबर आहे. सीडॅकमधील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचं बी.ई.बी.टेक, एमसीए, एम.ई. एमएससी किंवा पीएजडी झालेलं असणं आवश्यक आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दिल्ली, पुणे आणि हैदराबाद येथे नोकरीसाठी रुजू व्हावे लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here