विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज ,संत सेवालाल महाराज, संत गाडगे महाराज, संत रविदास महाराज जयंती निमित्त व सामाजिक भावनेतून सोयगांव शिक्षक भारती व सोयगांव पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला असून रक्तदात्यांनी रक्तदानाचे शतक पर्ण करून या रक्तदान शिबीरात रक्तदान करून पवित्र कार्य केले असून सर्व प्रथम शहरातील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज,संत सेवालाल महाराज संत गाडगे महाराज,संत रवीराज महाराज यांच्या प्रतिमे पुजन मान्यवरांच्या हस्ते करून रक्तदान शिबीराची सुरुवात करण्यात आली.रक्तदान शिबीरास नगराध्यक्षा आशाबी तडवी उपनगराध्यक्षा सुरेखा काळे,गटविकास अधिकारी नाईक साहेब यांच्या सह मान्यवरांनी रक्तदान शिबीरात भेट दिली. शिक्षक,पत्रकार,पोलीस,ग्रामस्थ,व्यापारी,डाँक्टर, शेतकरी,तरुण वर्गांनी रक्तदान करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून पहील्याच वर्षी जवळपास रक्तदानाचे शतक पुर्ण केले असून या रक्तदान शिबीरासाठी रक्तदान संकलनाचे काम जळगाव येथिल इंडियन रेड क्रॉस सोसायटी यांनी केले.या रक्तदान शिबीरास सर्व पत्रकार संघटना,व्यापारी संघटना,होमगार्ड पथक,शिक्षक,जिजाऊ फांडेशन, श्री अँग्रो एजन्सीज,यांच्या स्वयंसेवकांनी रक्तदान कले.रक्तदानास तरूण वर्गाचा सहभाग जोखाण्या जोगा होता.रक्तदान शिबीरास पूनमताई तळेले, शिवेसना महिला आघाडीच्या द्रौपदाबाई सोनवणे, पत्रकार भरत पगारे,दिलीप शिंदे,ईश्वर इंगळे,विजय काळे,योगेश बोखारे,दत्तू काटोले,विजय चौधरी,यासिन बेग,व्यापारी संघाचे विवेक महाजन,प्रमोद रावणे शिक्षक भारतीचे नरेंद्र बारी,प्रताप सांळूखे,मोतीराम जोहरे,रामदास फुसे,उमेश महालपुरे,रविंद्र तेली,विकास पवार,सुभाष परदेशी,रविंद्र बसैय्ये,बाळू सुळ,प्रषित पाटील,अविनाश पवार,समाधान चोपडे,,जितू कोळी,गणेश पाटील,महेश पाटील,नितेश गवादे,वालदे सर,अविनाश आखाडे याच्या सह अनेकांनी रक्तदानात सहभाग नोंदविला विषेश रक्तदान शिबीरास गलवाड येथिल माजी सरपंच सुरेखाबाई तायडे यांनी ही रक्तदान केले तसेच सोयगांव केंद्राचे केंद्र प्रमुख मोतीराम त
जोहरे व पत्रकार दिलीप शिंदे शिक्षक भारतीचे नरेंद्र बारी यांनी आपल्या पाल्यासह रक्तदान केले रक्तदान शिबीर यशस्वीते साठी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदाम शिरसाठ,पोलीस उपनिरीक्षक सतिष पंडीत,पोलीस उपनिरीक्षक भरत पाचोडे,पोलीस सागर गायकवाड यांनी तसेच शिक्षक भारती मोतीराम जोहरे,तालुकाध्यक्ष किरण पाटील,कार्याध्यक्ष महेश गवादे,प्रताप सांळूखे,किशोर जगताप यांनी अथक प्रयत्न केले.