सेवाकेंद्राच्या माध्यमातून मानवी कल्याण साधा – आबासाहेब मोरे

0
2

अडावद ता.चोपडा, प्रतिनिधी । श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न ,समस्या सोडवून दुःखी पिडा दूर करून मानवी कल्याण साधण्याचे अवाहन दिंडोरी येथील कृषीरत्न आबासाहेब मोरे यांनी केले. येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र कृष्णाजी नगर अडावद येथे ग्राम व नागरी अभियान प्रशिक्षण आणि जागतिक कृषी महोत्सव आढावा प्रसंगी ते बोलत होते.

अडावद येथील कृष्णाजी नगरातील श्री स्वामी सेवाकेंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात कृषीरत्न आबासाहेब मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.गोपुजन करून आढावा बैठकीस प्रारंभ झाला.यावेळी मार्गदर्शन करतांना आबासाहेब मोरे म्हणाले की,सर्वानी शेती समजून घ्या रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विषमुक्त अन्न कसे तयार करता येईल यासाठी अन्नावर संस्कार असने गरजेचे आहे.शेण व गोमुत्राचे महत्व ओळखण्याची गरज असल्याचे सांगत श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा करा कोणालाही जास्त नियम न सांगता लोकांपर्यत स्वामी महाराजांचा जप आणि पंचमहायज्ञ पोहचवा हेच सत्कर्म आहे.केंद्र केवळ चार भिंतित किंवा फक्त आरती पुरते मर्यादित ठेवू नका सेवा कार्यातील १८ विभागातून सेवाकार्य तळागाळापर्यत वाढवा .

मृत्यू समयी कोणी बरोबर येत नाही.मृत्यूनंतरचा प्रवास एकट्यानेच करावा लागणार असल्याने जीवनात केलेले सत्कर्मच सोबत येत असल्याचा मौल्यवान सल्ला कृषीरत्न आबासाहेब मोरे यांनी याप्रसंगी दिला. तालुक्यातील सर्व केंद्राचा आढावा घेत.विभागीय कृषी मेळाव्यास उपस्थिती देण्याचे अवाहन करण्यात आले.यावेळी स्वामी महाराज,भारत माता यांची चिमुकल्यांनी वेशभुषा साकारून पालखी सोहळा काढण्यात आला.बारा महिन्यांचे सण आणि भारतीय अस्मिता यांचे तसेच जागतिक कृषी महोत्सवाचे स्टाँल लावून माहिती देण्यात आली.सुत्रसंचलन गजानन कासार,प्रास्ताविक जिल्हा प्रतिनिधी विजय निकम,आभार अशोक लोहार यांनी मानले.

कार्यक्रमांस तालुका प्रतिनिधी एन.के.सोनवणे,बाजार समिती सभापती दिनकर देशमुख ,भाजपा उपाद्यक्ष राकेश पाटील, ग्रा.प.सदस्य डिंगबर पाटील,योगेश गोसावी,मुख्याध्यापक राजेंद्र पवार,व्यापारी असोशिएनचे अद्यक्ष उमेश कासट,किशोर सोनवणे,वनश्री दशरथ पाटील,अरूण पाटील,उमेश देशमुख,निळकंठ पाटील,दत्तात्रेय पाटील आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here