सुप्रिया सुळेंनी घेतली एकनाथ खडसेंची भेट ; चर्चेला उधाण

0
4

मुंबई : राज्याच्या राजकारणात राजकीय नेत्यांच्या भेटी – गाठींचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे . काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसेंची भेट घेतली आहे. नेमकी ही भेट का झाली याचं कारण अस्पष्ट असले तरी सुप्रिया सुळे यांनी चर्चेसाठी भेट घेतल्याचे फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शरद पवारांची अनेक नेत्यांनी, मंत्र्यांनी भेट घेतली होती. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही पवारांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट घेतली होती. त्यानंतर कॉंग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही भेट घेतली होती. त्यामुळे आता खडसे आणि सुप्रिया सुळे यांच्यात काय चर्चा झाली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here