सिडकोच्या अभियंतांनी भरला वॉकिंगसाठी ५ हजारांचा दंड; नियमांची पायमल्ली

0
5

नवी मुंबई :  प्रतिनिधी

राज्यात सरकारने कडक लॉकडाऊन (Lockdown) घोषित केले आहे. तसेच कठोर निर्बंधही लादले आहेत. या निर्बंधामुळे वॉकिंगला (Morning walk) बंदी असतानाही सिडकोच्या एका अभियंतांनी (CIDCO engineer) नियमाचे उल्लंघन केले. या अभियंतावर तीन वेळा दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वॉकिंग करणे थांबवणार नाही म्हणत त्यांनी आगाऊ पाच हजार रुपयांचा दंड पालिकेला भरला आहे.

या घटनेवरून शासकीय अधिकारीच नियमांचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट दिसून येते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लागू आहे. या काळात सरकारने मॉर्निंग वॉक करण्यावरदेखील बंदी घातली आहे. यामुळे सर्व वॉकच्या ठिकाणांवर पालिकेमार्फत नियम तोडणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. चार महिन्यांत १ हजाराहून अधिक व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत. जर शासकीय अधिकारीच बेधडकपणे नियमांची पायमल्ली करत असेल तर सामान्य नागरिकांकडून काय अपेक्षा ठेवणार आहे.

सिडको अभियंते राजीव सिंग यांच्यावर दंडात्मक कारवाई करूनसुद्धा ते पुन्हा वॉकिंगला येत होते. या, दरम्यान त्यांनी ५ हजार रुपये दंड भरून वॉकिंग सुरूच ठेवले. यामुळे त्यांना मंगळवारी पोलीस ठाण्यात नेऊन समज देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here