सिखवाल ब्राह्मण समाज संस्थेतर्फे रक्तदान शिबीर

0
20

जळगाव : प्रतिनिधी
भगवान परशुराम जयंतीचे औचित्य साधून महर्षी श्रुंगऋषी (सिखवाल ब्राह्मण समाज) बहुउद्देश्यीय संस्थेतर्फे आज रक्तदान शिबराचे आयोजन करण्यात आले.
सध्या कोरोनाची आपत्ती सुरू असून रक्ताची आवश्यकता मोठ्या प्रमाणात भासत आहे. या अनुषंगाने आज भगवान परशुराम जयंतीचे औचित्य साधून महर्षी श्रुंगऋषी (सिखवाल ब्राह्मण समाज) बहुउद्देश्यीय संस्थेतर्फे आज रक्तदान शिबराचे आयोजन करण्यात आले. शहरातील ओक मंगल कार्यालयाच्या समोर या कार्यक्रमाचे कोरोनाच्या नियमांचे पालन करून आयोजन करण्यात आले.
महापौर जयश्री सुनील महाजन आणि उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिरास प्रारंभ करण्यात आला. मंडळातर्फे भगवान परशूरामाची आरती करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भगवान परशुराम जयंतीचे औचित्य साधून महर्षी श्रुंगऋषी (सिखवाल ब्राह्मण समाज) बहुउद्देश्यीय संस्थेचे अध्यक्ष प्रकाश जोशी, उपाध्यक्ष रवी पांडे, सचिव निखील शर्मा, हर्षल सिखवाल, शुभम ओझा, यश तिवारी, मोहित जोशी, संजय व्यास, उत्तम जोशी, रवींद्र पांडे, शाम पांडे यांच्यासह महिला मंडळाच्या उषा सिखवाल, ज्योती जोशी, जया व्यास आणि लिना तिवारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here